Pimpri Chinchwad Crime : 'तू जाड आहेस' म्हणून हिणवलं, शाळेतील वाद टोकाला गेला; एकाचा दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये एका नामांकित शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या भांडणाची सुरुवात किरकोळ कारणामुळे झाली.
Pimpri Chinchwad Crime
Pimpri Chinchwad CrimeSaam Tv
Published On

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित शाळेत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खासगी नामांकित शाळा आहे. या शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. शाळेतल्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला 'तू जाडा आहेस' असे चिडवले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरु झाले. या भांडणाचे रुपांतर पुढे प्राणघातक हल्ल्यात झाले.

Pimpri Chinchwad Crime
Shocking : आईला भूतबाधा झाली म्हणून मांत्रिकाला घरी बोलावले, तरुणाने मांत्रिकासह जन्मदात्या आईला केली मारहाण; महिलेचा मृत्यू

भांडणातील एका विद्यार्थ्याने त्याच्या भावाला आणि मित्राला शाळेबाहेर बोलावले. त्यांनी मिळवून दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. भांडणात तिसराच विद्यार्थी मध्ये पडला. त्याने हा वार रोखण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात तिसऱ्या विद्यार्थ्याच्या डोळ्यावर गंभीर जखम झाली आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर चार टाके लागले आहेत.

Pimpri Chinchwad Crime
Mira Bhayander Marathi Morcha : मीरारोड स्टेशनबाहेर मोर्चा, आंदोलनस्थळी चिमुकल्याची शिवगर्जना; पाहा Video

दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी एकजण आला. भांडणात त्याच्यावर धारदार शस्त्राने जखमा झाल्या. हल्ल्यातून वाचवायला सरसावलेच्या, मध्यस्थी करणाऱ्याच्या डोळ्याला जखम झाली. त्याच्या डोळ्यावर चार टाके लावावे लागले. या जखमी विद्यार्थ्याच्या पालकाच्या फिर्यादीवरुन सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Pimpri Chinchwad Crime
Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! कॉम्प्युटर क्लास मालकाकडून शिक्षिकेचा विनयभंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com