Mumbai Local Block : रविवारी लोकल प्रवासाचा विचारही नको; हार्बर मार्गावर ब्लॉक, 'या' मार्गावरील ट्रेन बंद

Harbor Local Railway Block : हार्बर रेल्वेवर रात्री रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवार दिनांक २७.०४.२०२५ रोजी हार्बर मार्गावर आणि विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
Mumbai local block on harbour route on Sunday
Mumbai local block on harbour route on Sunday Saam Tv News
Published On

मुंबई : हार्बर रेल्वेवर रात्री रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवार दिनांक २७.०४.२०२५ रोजी हार्बर मार्गावर आणि विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक २७.०४.२०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे.

कोणत्या रेल्वे सुरु कोणत्या बंद?

विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर सकाळी ८.०० वाजल्यापासून ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत

डाऊन मेल / एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 11055, 11061 आणि 16345 विद्याविहार स्थानक येथे डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानक येथे पाचव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि ब्लॉक कालावधीत १० ते १५ मिनिटे उशिराने चालतील.

अप मेल / एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 11010, 12124, 13201, 17221, 12126, 12140 आणि 22226 या गाड्या ठाणे स्थानक येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि विद्याविहार स्थानक येथे सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि ब्लॉक काळात त्या वेळापत्रकापेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने चालतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप हार्बर मार्गावर ११.१० वाजल्यापासून ते १६.१० वाजेपर्यंत आणि डाऊन हार्बर मार्गावर ११.४० वाजल्यापासून ते १६.४० वाजेपर्यंत ब्लॉक परीचालीत करण्यात येईल.

Mumbai local block on harbour route on Sunday
पर्यटकांना वाचविण्यासाठी जीवाची बाजी, दहशतवाद्यांनी काश्मीरी तरुणाला मारलं; आदिल शाहच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदेंची मोठी मदत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१६ वाजल्यापासून ते दुपारी १६.४७ वाजेपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ वाजल्यापासून ते दुपारी १६.४३ वाजेपर्यंत रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून ९.५३ वाजल्यापासून ते १५.२० वाजेपर्यंत शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून १०.४५ वाजल्यापासून ते १७.१३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत कुर्ला - पनवेल दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Mumbai local block on harbour route on Sunday
Satara Accident : भरधाव कारचालकाचं नियंत्रण सुटलं, तीन विद्यार्थ्यांना चिरडत वाहन पलटी; साताऱ्यात भीषण अपघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com