Satara Accident : भरधाव कारचालकाचं नियंत्रण सुटलं, तीन विद्यार्थ्यांना चिरडत वाहन पलटी; साताऱ्यात भीषण अपघात

Satara Karad Accident : कराड शहरातील कृष्णा नाका येथे भरधाव चारचाकी इको गाडीने ९ ते १० वाहनांना आणि तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उडवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Satara Karad accident
Satara Karad accidentSaam Tv News
Published On

सातारा : राज्यात अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीय. असाच एक भीषण अपघात सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला आहे. कराड शहरातील कृष्णा नाका येथे भरधाव चारचाकी इको गाडीने ९ ते १० वाहनांना आणि तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उडवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय पवार असं चालकाचं नाव असून एअर बॅग उघडल्याने चालक बालंबाल बचावला आहे. मात्र, कारमध्ये असेलेली महिला जखमी झालीय. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांना उडवल्यानंतर जवळपास २ किलोमीटर अंतरावर वाहनांना धडक देत ही कार पलटी झाली. दरम्यान, या भीषण अपघातात वाहनाचा चक्काचूर झालेला असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमलेली होती.

दरम्यान, असाच काहीसा अपघात सातारा जिल्ह्यातील सर्कलवाडी या गावात घडला आहे. एका मद्यधुंद पोलीसाने भरधाव वेगाने कार चालवत अंगणात झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. रमेश लक्ष्मण संकपाळ (वय ५५) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भुईंज पोलिस स्टेशनला असलेली नाईट ड्युटी संपवून हवालदार ज्ञानेश्वर बाबुराव राजे (रा. वाघोली, ता. कोरेगाव) हे त्यांच्या कारमधून घरी निघाले होते. दरम्यान पहाटे सव्वा तीन वाजता सर्कलवाडीत आल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

Satara Karad accident
CSK vs SRH IPL 2025 : MS धोनी आणि काव्या मारनसाठी आज करो या मरो! CSK आणि SRHपैकी जो हरणार त्याला 'गुड बाय'; जाणून घ्या समीकरण

रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने गाडी चालवत ज्ञानेश्वर राजे मार्गस्थ झाले होते. मात्र ते ड्युटी आटोपून गाडी चालवत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असल्याने घराच्या दिशेने भरधाव वेगाने गेली. दरम्यान पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर राजे हे दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर सदर पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

गावात यात्रा असल्याने ग्रामदैवत जानुबाई देवीचा उत्सव सुरु आहे. तर सदर घटनेत मृत झालेले रमेश संकपाळ हे ग्रामदैवत जानुबाई देवीच्या छबिन्याचा कार्यक्रम आटोपून रात्री घराच्या बाहेर अंगणात झोपले होते. रात्री गाढ झोपेत असताना त्यांना भरधाव कारने चिरडले असता संकपाळ यांच्यावर काळाने घाला घातला. ऐन यात्रेत पहाटे झालेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Satara Karad accident
गर्दीचा ताण मिटणार! शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड अन् ८ पार्किंग लॉट्स, नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com