Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Mumbai Kandivali Crime: आर्थिक वादामुळे पती-पत्नीमध्ये भांडण झालं आणि वाद विकोपाला गेला. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली. घरातच आयुष्याचा दोर कापला.
Mumbai Kandivali Crime
Mumbai Kandivali CrimeSaam Tv News
Published On

कांदिवलीतील आकुर्ली परिसरातून धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नीनं घरातच आयुष्य संपवलं. पैशाच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. वाद विकोपाला गेला. त्यानंतर कटरे यांच्या पत्नीनं गळफास घेत आत्महत्या केली. राज्यात विवाहित महिलांच्या आत्महत्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच, म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

रेणु कटरे (वय वर्ष ४४) असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या त्या पत्नी. रेणु आपल्या सासरच्यांसोबत मुंबईतील कांदिवलीतील आकुर्ली परिसरात राहत होत्या. त्या शिक्षिका असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वारंवार वाद सुरू होते.

Mumbai Kandivali Crime
Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेत धुत

वादाचं स्वरूप भांडणात झालं. शनिवारी दोघांमधील वाद विकोपाला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रेणु यांनी घरातच गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर रेणु कटरे यांचे भाऊ अॅड. नितीन शेवाळ यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली.

Mumbai Kandivali Crime
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

त्यांनी यावेळी रेणु कटरे यांच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले. आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. बहिणीचा छळ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, समतानगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Mumbai Kandivali Crime
'रोहित पवार भाजप नेत्यांना भेटतात, शरीराने शरद पवारांसोबत पण मनाने..'; भाजपमधील बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com