Railway Accident : हायकोर्टाचा मोठा निर्णय! रेल्वेत चढताना पडून मृत्यू झाला तरी भरपाई मिळणार

Bombay High Court On Railway Accident : प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे रेल्वे अपघातातील भरपाई नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिला. मृताच्या आईला ८ लाख रुपये भरपाई देण्याचे रेल्वेला आदेश.
Mumbai High Court Nagpur Bench Orders ₹8 Lakh Railway Accident Compensation
Mumbai High Court Nagpur Bench Orders ₹8 Lakh Railway Accident CompensationGoogle
Published On
Summary
  • नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

  • प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे रेल्वे अपघाताची भरपाई नाकारता येणार नाही

  • यवतमाळच्या तरुणाला ८ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातातील भरपाईबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रेल्वे पकडताना झालेल्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याच्या कारणावरून भरपाई नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने यवतमाळ जिल्ह्यातील मृत तरुणाच्या आईला ८ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. सदर रक्कम तीन महिन्यांच्या आत देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश अशोक निमकर यांचा १४ मे २०२३ रोजी मूर्तीजापूर रेल्वेस्थानकावर अपघाती मृत्यू झाला होता. रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन ते रेल्वेच्या चाकाखाली आले. या घटनेनंतर त्यांच्या आईने भरपाईसाठी दावा दाखल केला होता. मात्र, रेल्वेने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे कारण देत हा दावा फेटाळला होता.

Mumbai High Court Nagpur Bench Orders ₹8 Lakh Railway Accident Compensation
Shocking : नांदेड हादरलं! १० वर्षीय विर्द्यार्थिनीवर शाळेत अत्याचार; मुख्यध्यापकाने जबरदस्ती केली अन्...

या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रत्येक रेल्वे अपघाताला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळेलच असे नाही. उपलब्ध कागदपत्रे, पुरावे आणि घटनेच्या पार्श्वभूमीवर अपघाताचा निष्कर्ष काढता येतो. त्यामुळे केवळ प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नसल्यामुळे मृताच्या कुटुंबाला भरपाईपासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही. रेल्वेत चढताना झालेला अपघातही ‘अनपेक्षित रेल्वे घटना’ या संकल्पनेत येऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच ‘रेल्वेतून पडणे’ या तरतुदीचा अत्यंत संकुचित अर्थ घेता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Mumbai High Court Nagpur Bench Orders ₹8 Lakh Railway Accident Compensation
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

रेल्वे पकडताना प्रवाशाचा तोल जाऊन तो चाकाखाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत प्रवाशाच्या मृत्यूला रेल्वे प्रवासाशी संबंधित अनपेक्षित घटना मानता येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयांचा आधार घेत नागपूर खंडपीठाने मृत अंकुश निमकर यांच्या आईच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा निर्णय बाजूला सारत ८ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com