Shocking : नांदेड हादरलं! १० वर्षीय विर्द्यार्थिनीवर शाळेत अत्याचार; मुख्यध्यापकाने जबरदस्ती केली अन्...

Nanded Crime News : नांदेडच्या श्रीनगर परिसरातील शाळेत १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा मुख्याध्यापकावर आरोप. पोलिसांनी पोक्सोसह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संशयिताला ताब्यात घेतले.
Nanded School Principal Accused In Minor Girl Assault Case
Nanded School Principal Accused In Minor Girl Assault Case Saam Tv
Published On
Summary
  • नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार

  • १० वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार

  • ५० वर्षीय संशयित मुख्याध्यापकाला अटक

  • पुढील पोलीस तपास सुरु

नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत असताना संबंधित मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यावेळी मुलीने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पालकांनी तातडीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Nanded School Principal Accused In Minor Girl Assault Case
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत भाग्यनगर पोलिसांनी काल रात्री संशयित मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्यावर अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्यासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील ५० वर्षीय संशयित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, मुलीचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.

Nanded School Principal Accused In Minor Girl Assault Case
CJP Attack : सरकारी शाळेची पोलखोल करायला गेलेल्या CJP टीमवर जीवघेणा हल्ला, Video व्हायरल

या प्रकरणाचा तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनेला दुजोरा देत पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांकडूनही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com