Mumbai Rain : भातसा धरण ६५ टक्के भरले, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या कोणत्या धरणात किती साठा?

Mumbai Rain Dam Water Level : मुंबईतील मुसळधार पावसानंतर सात धरणांतील पाणीसाठा 69.74 टक्क्यांवर पोहोचला असून चार धरणे भरून वाहू लागली आहेत. बीएमसीने पाणीपुरवठ्याबाबत दिलासा दिला असून आयएमडीने पुढील 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
MUMBAI WATER STORAGE NEARS 70% AFTER HEAVY RAIN | FOUR DAMS OVERFLOW | BMC & IMD UPDATE
MUMBAI WATER STORAGE NEARS 70% AFTER HEAVY RAIN | FOUR DAMS OVERFLOW | BMC & IMD UPDATESaam Tv
Published On
Summary
  • मुसळधार पावसानंतर मुंबईच्या सात धरणांतील पाणीसाठा 69.74 टक्क्यांवर पोहोचला

  • चार धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा

  • गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण पाणीसाठा अद्याप कमी

  • आयएमडीने पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा दिला

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. बीएमसीच्या माहितीनुसार, मुंबईच्या पाणीसाठ्याने आता ७० टक्क्यांच्या जवळपास मजल मारली असून चार धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे आगामी काही महिन्यांसाठी पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळाला आहे. मात्र यंदा पाऊस उशिराने सुरु झाल्याने, गेल्या वर्षाच्या तुलनेत साठा अद्याप कमी आहे.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, सातही धरणांमध्ये मिळून सध्या 10 लाख 9 हजार 432 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या सुमारे 69.74 टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणांमधील पाणीसाठा 86.88 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे यंदा पावसाने वेग घेतला असला तरी साठा अजूनही मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

MUMBAI WATER STORAGE NEARS 70% AFTER HEAVY RAIN | FOUR DAMS OVERFLOW | BMC & IMD UPDATE
Tea Tips : गोड की खारट? चहासोबत कोणतं बिस्कीट खाणं ठरेल शरीरासाठी घातक

मुंबईला पाणीपुरवठा करणारी भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, तानसा, विहार आणि तुळशी ही सात धरणे मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये आहेत. यापैकी मुंबईच्या पाणीपुरवठ्यात सर्वात जास्त असलेल्या भातसा धरणात सध्या सुमारे 65 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या 24 तासांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 100 ते 230 मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली असून, पुढील 24 ते 48 तासांत आणखी पावसाची शक्यता असल्याने जलसाठ्यात अधिक वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

MUMBAI WATER STORAGE NEARS 70% AFTER HEAVY RAIN | FOUR DAMS OVERFLOW | BMC & IMD UPDATE
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

दरम्यान, IMD ने मुंबई आणि परिसरासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहून शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून 24 जुलैपर्यंत जोरदार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 26 जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, आज सायंकाळी 6.22 वाजता सुमारे 3 मीटर उंच भरती येण्याची शक्यता असल्याने बीएमसीने नागरिकांना समुद्रकिनारे आणि सखल किनारी भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 1.32 वाजता ओहोटी अपेक्षित असून, हवामानातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com