Mumbai Local Update: हार्बर मार्गावर 'अप' आणि 'डाऊन' लोकल ठप्प; प्रवाशांचे मेगाहाल

Mumbai Local Train News : मुंबईच्या हार्बर मार्गावर गोवंडी-चेंबूर दरम्यान ओएचई वायर तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा ठप्प झाली आहे.
Mumbai Local Update
Mumbai Local Update
Published On

Mumbai Local Update, Harbour Line disruption : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेच्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मनस्तापाला सामोरे जावे लागले. गोवंडी-चेंबूर या स्थानकादरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वर वायर तुटल्यामुळे हार्बर लाईनवरील 'अप' (Up) आणि 'डाऊन' (Down) दोन्ही मार्गिकांवरील लोकल सेवा सकाळी ९:१६ वाजल्यापासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. मागील तासभरापासून प्रवासी लोकलमध्येच अडकून आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड समजताच रेल्वेचे इंजिनिअर्स आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम (Restoration work) सुरू करण्यात आले आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त करून विस्कळीत झालेली वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Mumbai Local Update
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय,₹ १५०० कधी जमा होणार?

ऐन कामावर जाण्याच्या वेळीच लोकल सेवा बंद झाल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून चाकरमान्यांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा (मध्य रेल्वे किंवा बस सेवा) वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Mumbai Local Update
NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव
Mumbai Local Update
Breaking News: कार आणि ट्रकचा भीषण अपघात; ३ वरिष्ठ पोलिसांसह चौघांचा जागीच मृत्यू, महामार्गावर रक्ताचा सडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com