Mumbai Fire Update: मुंबईच्या लोअर परळमधील फिनिक्स मॉलमध्ये आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
Mumbai Fire News update:
मुंबईच्या लोअर परळच्या फिनिक्स मॉलला आग लागल्याची घटना घडली आहे. या मॉलला सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. या फिनिक्स मॉलला नेमकी कशी आग लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या लोअर परळ येथील फिनिक्स मॉलला आग लागली आहे. लोअर परळच्या फिनिक्स मॉलमधील पार्किंगमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी दुपारी १ वाजता लागलेल्या आगीत काही नुकसान झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही. या पार्किंगमध्ये २५ ते ३० दुचाकी होत्या. आग लागल्यानंतर उपस्थित काही लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिलला लागलेल्या आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. या मॉलला नेमकी आग कशी लागली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली आहे.
साकिनाक्यात कारखान्याला आग
मुंबईतील लोअर परळला आग लागल्यानंतर आता साकीनाक्यात देखील आग लागल्याची घटना घडली. मुंबईतील साकीनाका परिसरातील एका कारखान्याला आग लागली. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचत कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.