Maharashtra Politics: राम मंदिरासाठी १ कोटींची देणगी कुणाकडून घेऊन दिली? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Nitesh Rane vs Sanjay Raut: अयोध्येतील राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनी दिलेली १ कोटी रुपयांची देगणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेऊन दिली हे खरं आहे का? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay RautSaam TV
Published On

Nitesh Rane vs Uddhav Thackeray

रामलल्लाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठे दान दिलं असेल, तर ते शिवसेनेने दिलं आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली सर्वात आधी राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली होती, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Dog Attack News: सोसायटीत खेळत असलेल्या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; शरीराचे लचके तोडले, भयानक VIDEO

अयोध्येतील राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेली १ कोटी रुपयांची देगणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेऊन दिली हे खरं आहे का? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना फक्त निवडणुकांपूर्वीच रामलल्लाची आठवत येते, असा खोचक टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

संसदेतील खासदारांच्या निलंबनानंतर उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्यावर टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मिमिक्री केली होती. या मिमिक्रीचं संजय राऊत यांनी बोलताना अप्रत्यक्षपणे समर्थन केलं होतं. संसदेत खूप कलाकार असतात, असं राऊत म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्याचा देखील नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्हाला कुणाची मिमिक्री करणं, आवाज काढणं, याचं समर्थन करायचं असेल, तर मग आदित्य ठाकरे यांना बघून म्याऊ म्याऊचा आवाज काढला, तर का ऐवढं झोंबलं, असा खोचक सवालही नितेश राणे यांनी केला.

दरम्यान, अयोध्येचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे. भाजपच्या नावावरती नाही. रामल्लाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते (भाजप) मते मागतता, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. यावर बोलताना अयोध्येचा सातबारा हा कडवड हिंदूंचा अधिकार असून सातबाऱ्यावर समस्त हिंदूचं नाव आहे, तुमच्यासारख्या चायनिस मॉडेल हिंदूंचा नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay Raut
JN.1 Covid Cases: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं; ठाण्यात एकाच दिवशी ५ रुग्ण; राज्यभरात ९ रुग्णांची नोंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com