Dog Attack News: सोसायटीत खेळत असलेल्या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; शरीराचे लचके तोडले, भयानक VIDEO

Dog Attack on Child Viral Video: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीत खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर अचानक ३ भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला.
Pune Dog Attack on Child Viral Video
Pune Dog Attack on Child Viral Video Saam TV
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही | पुणे २५ डिसेंबर २०२३

Pune Dog Attack on Child Viral Video

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीत खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर अचानक ३ भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. कुत्रे मागे लागताच या चिमुकल्याने जीवाच्या आकांताने धाव घेतली. मात्र, पळता-पळता हा चिमुकला कोसळला. त्यानंतर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Dog Attack on Child Viral Video
Onion Rate Today: कर्जबाजारी शेतकऱ्याला कांद्याने रडवलं; लाखोंचा खर्च अन् मिळाला १ रुपये किलोचा भाव

आरडाओरड होताच कुत्र्यांनी पळ काढला. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाली आहे. पुण्याच्या हांडेवाडी येथील कुमार पेबल पार्क सोसायटीत ही घटना घडली आहे.

या घटनेनंतर पुणे महानगरपालिकेकडे त्वरीत कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune News) मोकाट कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर भटके कुत्रे हल्ला करीत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

एखाद्याचा नाहक बळी जाण्यापूर्वी कुत्र्याचा योग्य बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने कुत्र्यांच्या हल्ल्याची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार, गेल्या ९ महिन्यांत तब्बल १६ हजार ३७२ जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले आहेत.

मागील वर्षभराच्या तुलनेत ही आकडेवारी अधिक आहे. याशिवाय अनेक प्रकरणांची नोंद मनपाकडे झालेली नाही. पुणे मनपाकडून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे भटकी कुत्री कमी होत असली तरी त्यांचे हल्ले वाढत असल्याचे चित्र दुसऱ्या बाजूला दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com