Mumbai News : शालेय पोषण आहारातून अंडी गायब होणार? निर्णय रद्द करण्याची सत्ताधारी भाजपची मागणी

Withdraw Decision to include Eggs in School Nutrition : वारकरी संघटना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांसह जैन संघटना शिवाजी पार्क येथील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
Eggs in School Nutrition
Eggs in School NutritionSaam TV
Published On

Mumbai News :

शालेय पोषण आहारातून अंडी रद्द करा या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारलं होतं. आमच्या सात्विक धर्माला बाधा येत असल्याचा संघटनांनी आरोप केला होता. वारकरी संघटना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांसह जैन संघटना शिवाजी पार्क येथील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने देखील या मागणीला पाठिंबा दिला आहे. शालेय पोषण आहारात ‘अंडी’ समावेशाचा निर्णय रद्द करा अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने केली आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)

Eggs in School Nutrition
Loksabha Election 2024 : निवडणुकीआधीच महायुतीत बिनसणार?; मावळ लोकसभेच्या जागेवरुन तिन्ही पक्षात रस्सीखेच

तुषार भोसले यांनी लिहिलेल्या पक्षात म्हटलंय की, आपल्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विद्यार्थाच्या पोषण आहारात 'अंडी' चा समावेश केला आला आहे. मात्र या निर्णयाबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करीत आहोत.

Eggs in School Nutrition
Solapur Latest News : 'सोलापूर'वरुन भाजपच्या दोन आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध; नेमकं काय झालं?

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि विविध पंथ संप्रदायांच्या प्रमुखांनी व घटकांनी देखील याबाबत आमच्याकडे कडाडून विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळे आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी आमची मागणी आहे.

राज्यातील साधु-संतांच्या, विविध समाज घटकांच्या तसेच आध्यात्मिक क्षेत्राच्या भावनांचा आदर राखत आपण हा निर्णय रद्द कराल, अशी मला आशा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com