Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Watermelon Family Death Case: मुंबईत कलिंगड खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर विषारी औषधामुळे झाला आहे.
Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा
Mumbai Watermelon Family Death CaseSaam Tv
Published On
  • डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

  • कलिंगडात विष मिसळल्याचा धक्कादायक खुलासा

  • मुंबई पायधुनी कुटुंब मृत्यू एफएसएल अहवाल

  • झिंक फॉस्फाइडमुळे चौघांचा मृत्यू

मुंबईतल्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणी ११ दिवसांनंतर अखेर एक मोठा खुलासा झाला आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर या चौघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात होते. पण आता या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक कारण समोर आले आहे. कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर या चौघांच्या मृतदेहांमध्ये झिंक फॉस्फाइड या विषारी औषधांचे अंश आढळून आले. एफएसएलच्या अहवालात चारही मृतांच्या शरीरातील अवयव आणि नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईडचे अंश आढळून आले. झिंक फॉस्फाईड ही एक अत्यंत विषारी पावडर असून तिचा वापर उंदीर मारण्यासाठी केला जातो.

कलिंगडची देखील तपासणी करण्यात आली तर त्यामध्ये देखील या उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश आढळून आले. यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कलिंगडात विष कसे मिसळले गेले याचा तपास पोलिस करत आहेत. हा अपघात होता की कट होता, की संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली? याचा तपास आता पोलिस करत आहेत. त्यामुळे कलिंगड विषारी नव्हते तर त्यामध्ये विषारी औषध मिक्स करण्यात आले असल्याचे तपासातून आता समोर आले आहे.

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा
Watermelon Side Effects: कलिंगड खाल्ल्यानंतर हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका, थेट हॉस्पीटलमध्ये भरती व्हाल

२६ एप्रिलच्या रात्री मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया (४४ वर्षे), त्यांची पत्नी नसरीन (३५ वर्षे), मुली आयेशा (१६ वर्षे) आणि झैनब (१३ वर्षे) यांचा समावेश होता. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबाने आदल्या रात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी एक एक करत चौघांचाही मृत्यू झाला होता.

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा
Watermelon Storage Tips: कापून ठेवलेलं कलिंगड किती तास खाण्यायोग्य असतं?

कलिंगडया घटनेनंतर, पोलिस आणि न्यायवैद्यक पथकाने विविध बाजूंनी तपास सुरू केला. एफएसएल अहवालामध्ये सर्व मृतांच्या अवयवांमध्ये आणि शरीराच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइडचे अंश आढळून आले. हेच औषध टरबूजामध्येही आढळले. तसंच, घरातील इतर सर्व खाद्यपदार्थांची चाचणी नकारात्मक आली. या अहवालाबाबत आणि प्रकरणासंदर्भात मुंबई पोलिसांनी सांगितले की, न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या सहकार्याने अहवालाचा अभ्यास केला जात असून पुढील तपासात कारणांचा शोध घेतला जाईल.

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा
Watermelon Side Effects: कलिंगड खाल्ल्यानंतर हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका, थेट हॉस्पीटलमध्ये भरती व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com