

मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. या धरणांमध्ये केवळ ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी याच कालावधीत धरणांमध्ये ९१.९९ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा सुमारे १३ टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. आधीच पालिकेकडून १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. जर धरणातील पाणीसाठ्यात आणखी घट होत गेली तर पाणीकपात आणखी वाढवली जाईल.
१५ नोव्हेंबर २०२४ ला ८८.५३ टक्के साठा होता, तर यंदा १५ नोव्हेंबर २०२६ ला हाच पाणीसाठी ७९.७४ टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबरमध्येच पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ४१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सातही धरणांची एकूण साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर असून सध्या ११ लाख ५४ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे
- अप्पर वैतरणा - ९१. ७२ टक्के
- मोडकसागर - ४६. ०६ टक्के
- तानसा - ७५. ४१ टक्के
- मध्य वैतरणा - ७५. ९० टक्के
- भातसा - ८२. ०४ टक्के
- विहार - ८८. ०५ टक्के
- तुलसी - ८२. ०५ टक्के
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.