Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची चिंता वाढली! सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

Mumbai Dam Water Level Update: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातच धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे चिंता वाढली आहे.
Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची चिंता वाढली! सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
Mumbai Dam Water LevelSaam Tv News
Published On: 

गिरीश कांबळे, मुंबई

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. या पाणीसाठ्याने सर्वांची चिंता वाढवली आहे. या धरणांमध्ये गेल्या ८ वर्षांतील निच्चांकी पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या ऑडिटमध्ये तीन तलावांमधील बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याची माहिती समोर आली आहे.

उन्हाळा सुरू होण्यास अजून काही महिने बाकी असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.३ नोव्हेंबरपर्यंत सातही तलावांमधील एकत्रित पाणीसाठा ८४.३५ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांतील याच तारखेच्या तुलनेत हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या ऑडिटमध्ये तीन तलावांमधील बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्याचं समोर आलं आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची चिंता वाढली! सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
Mumbai News: मुंबईच्या महापौर पुन्हा चर्चेत! लाईक-शेअरसाठी खर्च करणार २५ लाख; शिंदेसेनेसह विरोधक आक्रमक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी एकूण १२.२० लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ९५.६७ टक्के होता. २०२४ मध्ये ९३.७५ टक्के, तर २०२३ मध्ये ८९.४६ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र तो थेट ८४.३५ टक्क्यांवर घसरला आहे. २०१८ मध्ये याच दिवशी ७९.६३ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतरची ही सर्वात खालची पातळी आहे. महापालिकेच्या ऑडिटमध्ये तानसा, मोडक सागर आणि मध्य वैतरणा या तीन तलावांमधील पाण्याच्या बाष्पीभवनाचा आढावा घेण्यात आला.

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची चिंता वाढली! सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
Mumbai News: BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार?

ऑक्टोबर महिन्यात या तलावांमधील बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत जवळपास दुप्पट किंवा त्याहून अधिक असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. तसेच तलावांमधील पाणीसाठ्याची आकडेवारीही चिंताजनक आहे. मोडक सागरमध्ये यंदा ५० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ८४ टक्के होता. तानसा तलावात यंदा ८१ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी तो ९५.९२ टक्के होता.

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची चिंता वाढली! सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
Mumbai News : मुंबईत धुरकं! दृश्यमानतेत घट, वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम?

विशेष म्हणजे, यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने पुढील मान्सूनपूर्व काळात तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची भर पडण्याची शक्यता कमी मानली जात आहे. सध्या मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू आहे. पावसाळा लांबल्यास पाणीकपात आणखी वाढवण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याआधीच मुंबईच्या पाणीपुरवठ्याचं गणित बिघडण्याची चिन्हं असून, आगामी काळात मुंबईकरांना पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबईतला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा -

भातसा धरण - ८८.३७ टक्के

अप्पर वैतरणा धरण- ९४.८७ टक्के

मध्य वैतरणा धरण- ८०.८४ टक्के

मोडक सागर धरण- ४९.०२ टक्के

तानसा धरण - ८१.८४ टक्के

विहार तलाव -९९.९५ टक्के

तुलसी तलाव - ९७.०९ टक्के

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची चिंता वाढली! सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
Mumbai News: मुंबईकरांसाठी खास कलापर्व! नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत बालचित्रकला प्रदर्शनाची रंगत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.