Mumbai Dam Water Level Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात होतेय वाढ, कोणत्या धरणात किती साठा?

Mumbai Dam News: आजच्या तारखेपर्यंत धरणामध्ये जमा झालेला पाणीसाठा (Mumbai Dam Water Level) हा मागच्यावर्षीच्या तुलनेमध्ये निम्माच आहे.
Mumbai Dam
Mumbai Dam Saam Tv
Published On: 

Mumbai Dam: गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे (Mumbai Rainfall) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे. सातही धरणांमध्ये ४२.७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पावसामुळे धरणाच्या (Mumbai Dam) पाणीसाठ्यात वाढ होत असली तर आजच्या तारखेपर्यंत जमा झालेला पाणीसाठा (Mumbai Dam Water Level) हा मागच्यावर्षीच्या तुलनेमध्ये निम्माच आहे. मागच्यावर्षी याच दिवशी या धरणांमधील पाणीसाठा ८८ टक्क्यांपेक्षा जास्त होता.

Mumbai Dam
Andheri Subway Closed For Traffic: मुंबईत मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी साचले पाणी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी मान्सून सक्रीय होऊन महिना पूर्ण झाला तरी देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला नाही. परिणामी या धरणांमध्ये कमी पाणी साचले आहे.

पण गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पाऊसामुळे या धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे. या सातही धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत नाहीये. आतापर्यंत या धरणांमध्ये जो पाणीसाठा जमा झाला आहे तो मागच्यावर्षीच्या तुलनेमध्ये निम्मा आहे. त्यामुळे आता ही सातही धरणं १०० टक्के भरण्यासाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Mumbai Dam
Alia Bhatt Spoke About Daughter: तिने बॉलिवूडमध्ये येऊ नये तर... आलियाने स्वतःच निवडलं मुलगी 'राहा'चं करियर

यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून दाखल व्हायला विलंब झाला. मागच्यावर्षी मुंबई आणि उपनगरामध्ये 11 जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. पण यावर्षी मान्सूनला दोन आठवडे उशीर झाला. मुंबई आणि उपनगरामध्ये 25 जूनपासून मान्सूनला सुरुवात झाली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला. पण त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. आता गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावासाचा जोर वाढला आहे. पण धरणक्षेत्रामध्ये म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत नाहीये.

Mumbai Dam
Mumbai Rain Today : मुंबईत मुसळधार; रेल्वे वाहतूक उशिराने, रस्ते तुंबले

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - 38 लाख 734 दशलक्ष लिटर

- मोडक सागर - 88 हजार 353 दशलक्ष लिटर

- तानसा - 11,30,65 दशलक्ष लिटर

- मध्य वैतरणा - 10 हजार 2994 दशलक्ष लिटर

- भातसा - 2,48,684 दशलक्ष लिटर

- विहार - 18 हजार 878 दशलक्ष लिटर

- तुळशी - 8046 दशलक्ष लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com