Titwala Crime: परप्रांतियांची मुजोरी! मराठी कुटुंबाला सळई- काठीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Outsider Beaten Marathi Family : टिटवाळ्यामध्ये परप्रांतियांनी एका मराठी कुटुंबाला काठ्यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
Outsider Beaten Marathi Family
Published On
Summary
  • टिटवाळ्यात मराठी कुटुंबावर हल्ल्याची घटना

  • लोखंडी सळई आणि काठीने मारहाण

  • भाषा वादामुळे तणाव वाढल्याची शक्यता

राज्यात मराठी-हिंदी भाषेवरून वाद चालू असताना परप्रांतियांच्या मुजोरी वाढल्याचं उदाहरण समोर आले आहे. मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात मराठी माणूस आणि परप्रांतियांचे वाद होत असतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलेले परप्रांतियांची इतकी मुजोरी वाढली की ते शहरातील मराठी माणसांवर रुबाब दाखवून लागले आहेत.

Outsider Beaten Marathi Family
Kalyan Crime: कल्याणमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला, २ तरुणांकडून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण

टिटवाळ्यात एका मराठी कुटुंबाला परप्रांतियांनी लोखंडी पाईप आणि काठीने मारहाण केली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे तर मनसेने संबंधित परप्रांतीय व्यक्तींवर ठोस कारवाईची मागणी केली आहे. टिटवाळ्यातील मोरया नगरी परिसरात राहणारे योगेश शिंदे यांच्या कुटुंबियांना मारहाण झाली आहे. त्यांनी याबाबत माहिती दिली की, त्यांच्या भागात पाईपलाईनमधून सतत पाणी गळती होत होती.

Outsider Beaten Marathi Family
Marathi vs Gujarathi: घाटकोपरमध्ये पुन्हा राडा! गुजराती व्यवसायिकाकडून मराठी व्यावसायिकाला मारहाण, संतापजनक कारण समोर

याबाबत संबंधित बिल्डरकडे तक्रार करण्यात आली होती. पाईपलाईन दुरुस्तीचे काम किती वेळा करू असे सांगून बिल्डरने काम करण्यास नकार दिला. अखेर रहिवाशांनी स्वखर्चाने पाईपलाईन दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. या कामाबाबत शेजारी राहणाऱ्या सुनील भाटन यांना याची माहिती देण्यात आली. मात्र काम सुरू करण्याच्या मुद्द्यावरून अचानक वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. योगेश शिंदेंच्या आरोपानुसार सुनील भाटन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करत मला व माझ्या आईला बांबूने मारहाण केली.

माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी दिलीप राठोड आणि अविनाश शिकवंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पीडित कुटुंबाला मदत केली. तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनेची तक्रार प्राप्त झाली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com