Mumbai Crime : मुंबईत भर रस्त्यात कोरियन तरुणीची छेड; संतापजनक घटनेचा VIDEO समोर, पोलिसांनी घेतली गंभीर दखल

मुंबईत (Mumbai) काही स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात एका कोरियन तरुणीची छेड काढली आहे. बुधवारी रात्री ही संतापजनक घटना घडली
Mumbai Korean Women Viral Video
Mumbai Korean Women Viral Video Saam TV

Mumbai Korean Women Viral Video : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत (Mumbai) काही स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात एका कोरियन तरुणीची छेड काढली आहे. बुधवारी रात्री ही संतापजनक घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ समोर येताच, मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. (Mumbai News Today)

Mumbai Korean Women Viral Video
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा प्रकरणात आणखी नवे खुलासे होणार?आफताबची आज नार्को टेस्ट

पीडित तरुणी ही युट्युबर असून ती दक्षिण कोरियाची नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात पोलिसांत कोणतीही तक्रार आली नसून, एका तरुणाने मुंबई पोलिसांना टँग करून हा व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओ समोर येताच, पोलिसांनी (Mumbai Police) या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून पोलिस छेड काढणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत. व्हिडिओ शेअर करणार्‍या (Viral Video) ट्विटर अकाउंटने दावा केला आहे, की पीडित महिला दक्षिण कोरियाची नागरिक आहे आणि रात्री 8 वाजता ही घटना घडली तेव्हा उपनगरीय खार भागात 'लाइव्हस्ट्रीमिंग' करत होती.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण या तरुणीच्या अगदी जवळ आला. या तरुणाने तिचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर सदरील तरुणी ही घटनास्थळावरून निघून जाऊ लागली, तोच हा तरुण पुन्हा या तरुणीच्या पाठीमागे स्कुटीवर येताना दिसला. तुला तुझ्या घरी सोडतो, असं म्हणत या तरुणाने कोरियन तरुणीला जबरदस्तीने स्कुटीवर बसवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या तरुणीने इंग्रजीत त्याची ऑफर स्पष्ट नाकारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी आतापर्यंत कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही, मात्र तपास सुरू केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे त्या व्यक्तीची ओळख पटवली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com