Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

Father Killed 4 Year Child In Pawoi: मुंबईत एका व्यक्तीने आपल्या मुलाची हत्या केली. दुधासाठी बाळ दूधच पीत असायचा. दुधासाठी रडत असल्यानं मद्यपी बापानं चिमुरड्याला जमिनीवर आपटलं.
Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं
Published On
Summary
  • पवई परिसरात चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

  • दूध मागून रडत असल्यामुळे वडिलांनी मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

  • आरोपी वडिलांना दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई शहरातील पवई परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दूध मागितल्याने एका वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार,तो मुलगा प्रामुख्याने दूधच प्यायचा. आरोपी बापाला दारूचं व्यसन असून त्याच्या त्या व्यसनापायी त्याची बायको काही दिवसांपूर्वीच माहेरी निघून गेली होती.

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं
अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

त्यामुळे बाळ त्याच्या वडिलांसोबत राहत होते. भुकेने व्याकुळ बाळ दुधासाठी रडत होते. याचा संताप आल्यानंतर वडिलांनी त्या मुलाला दरवाजावर आपटले त्यात बाळाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं
Mumbai : मुंबई हादरली! कांदिवली मेट्रो स्थानकातील लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग

दुधासाठी रडत असल्याने केली बाळाची हत्या

मुंबईतील पवई परिसरात एका चार वर्षांच्या मुलाची त्याच्या वडिलांनीच हत्या केली. मुलाच्या दुधासाठीच्या रडण्याने संतप्त झालेल्या वडिलांनी त्याला निर्घृणपणे मारहाण केली. आरोपी वडिलांनी चार वर्षाच्या मुलाला दरवाजावर आपटले, त्यात मृत्यू झाला. या प्रकरणी पवई पोलिसांनी आरोपी वडील, राजेश सिंग (२६) याला अटक केली आहे.

आरोपीला दारूचे व्यसन होते, या व्यवसनाला कंटाळून माहेरी निघून गेली होती. आरोपीची पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरकाम करते. ती सुमारे १४ दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती. मृत मुलाचे नाव यश सिंग होतं.

आरोपीच्या बहिणीकडून तक्रार दाखल

मिळालेल्या माहितीनुसार,मृत मुलगा एकुलता एक होता, तो एक मतिमंद मुलगा होता. त्यामुळे तो प्रामुख्याने आहारात दुधाचेच सेवन करत असायचा. घटनेच्या वेळी घरात फक्त राजेश आणि यश होते. हीच घटना गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पवईमधील गौतम नगर परिसरात घडली. शवविच्छेदन अहवालात डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मुलाच्या डोक्याला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपी राजेश सिंग याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com