मुंबईत ड्रग्जचा मोठा साठा सापडला! १० कोटींचं हेरॉईन जप्त, तस्करीचं कनेक्शन काय?

Mumbai Crime Branch Seizes Heroin: मुंबईतील बोरीवली परिसरात गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने २ किलो ३२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. १० कोटी १६ लाख रुपयांच्या अंमली पदार्थ प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
Mumbai Crime Branch seizes heroin
Mumbai Crime Branch seizes heroinsaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई शहरात अंमली पदार्थांची तस्करी, खरेदी-विक्री आणि पुरवठा करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या कक्ष ११, कांदिवली युनिटने बोरीवली परिसरात मोठी कारवाई करत एकूण २ किलो ३२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत १० कोटी १६ लाख रुपये असून, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरले जाणारे तीन मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले आहेत.

Mumbai Crime Branch seizes heroin
Dengue Death : ८ वर्षांच्या मुलीला 4-5 दिवस ताप आणि पोटदुखी; पुण्यात डेंगीचा पहिला बळी

मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी तसेच या व्यवसायात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस उपआयुक्त, प्रकटीकरण-१ आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.२२ वाजण्याच्या सुमारास कांदिवली युनिटच्या कक्ष ११ मधील पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोरीवली परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुरुवातीला दोन आरोपींकडून ७५८ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. या हेरॉईनची अंदाजे किंमत ३ कोटी ७९ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Mumbai Crime Branch seizes heroin
Mumbai Air Pollution: मुंबई जगातील तिसरे प्रदूषित शहर; श्वास घेणंही कठीण, AQI चा धक्कादायक रिपोर्ट

यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी १ किलो २७४ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या साठ्याची अंदाजे किंमत ६ कोटी ३७ लाख रुपये आहे. त्यामुळे या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचे एकूण वजन २ किलो ३२ ग्रॅम झाले असून, त्याची अंदाजे किंमत १० कोटी १६ लाख रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन मोबाईल फोनही जप्त केले आहेत. त्यांची एकूण अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून करण्यात आला, त्यामागे आणखी कोण व्यक्ती सहभागी आहेत आणि या तस्करीचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Mumbai Crime Branch seizes heroin
तुकाराम मुंढेंचा दणका! ११ प्रसिद्ध हॉटेल्स आणि बेकऱ्यांचे परवाने निलंबित, ५४ लाखांहून अधिकचा निकृष्ट अन्नसाठा जप्त

याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, हेरॉईनचा पुरवठा करणारे तसेच त्याची खरेदी-विक्री करणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपआयुक्त, प्रकटीकरण-१ आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटमधील कक्ष ११ च्या पथकाने केली. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेतील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com