Mumbai Air Pollution: मुंबई जगातील तिसरे प्रदूषित शहर; श्वास घेणंही कठीण, AQI चा धक्कादायक रिपोर्ट

Mumbai Pollution Crisis: आता मुंबई हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जाणार आहे...त्यामुळे मुंबईची हवा दिवसेंदिवस प्रदुषित कशी होतेय? प्रदुषित हवेमुळे नागरिकांचा श्वास कसा गुदमरतोय...
MUMBAI AIR POLLUTION
MUMBAI AIR POLLUTIONsaam tv
Published On: 

ऑक्टोबरची गुलाबी थंडी अनुभवायला मिळण्याऐवजी मुंबईकरांच्या नशिबी दसऱ्यानंतर आलंय ते कडक ऊन आणि धुरकट हवा . जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचे डोळे जळजळत असतील, घसा खवखवत असेल आणि दम लागून तुम्ही अक्षरशः मेटाकुटीला आला असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या सगळ्या आजारांचे कारण ऐकलं तर तुम्ही थक्क व्हाल कारण तुम्ही सहज श्वास घेताना जी हवा शरीरात घेताय ती मुंबईची हवा जगात तिसऱ्या क्रमांकाची प्रदुषित आहे. होय. प्रदुषणात आपल्या मुंबईचा क्रमांक जगात तिसरा आलाय. पाहा तुमच्या मुंबईत AQI कसा आहे पाहा

वांद्रे कुर्ला संकुल (BKC) १६६

कुलाबा १५४

भांडुप पश्चिम १४०

वरळी १४०

वांद्रे १३९

देवनार १३३

गोवंडी (शिवाजी नगर) १३०

अंधेरी (चकाला) १२९

मालाड पश्चिम १२३

बोरिवली पूर्व १०४

अमेरिकेच्या आयक्यूएयर संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित १२२ शहरांच्या यादीत मुंबई एकाच आठवड्यात पाचव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहचलीये. शहरात धूर आणि धुरक्याचं साम्राज्य पसरल्यामुळे मुंबईचं विहंगम रूप हरवून गेलंय. या प्रदुषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतोच आहे मुंबईच्या या बिघडलेल्या आरोग्यावर पालिकेनं आणि पर्यावरण तज्ञांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहा,

1. आयुक्त

2. पर्यावरणप्रेमी

मुंबईतील हे वातावरण पाहिल्यानंतर सध्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली पहिली गरजये. आपल्या सुंदर मुंबईची पावसाळ्यात तुंबई होते तर उन्हाळ्यात धुळीनं हे शहर माखतं. पण याचं सोयरंसुतक प्रशासनाला नाहीच. ज्यांच्यावर शहराच्या आरोग्याची जबाबदारी आहे त्यांनी वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी आतापर्यंत काय केलं याचा हिशोब मिळणंही तितकंच गरजेचंय. महानगरपालिकेने आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता झोपेतून जागं होऊन आता अँक्शनमोड मध्ये येण्याची गरजये असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com