Nalasopara : बायकोच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून राडा; लग्नाच्या वाढदिवशीच नवऱ्यासोबत भयंकर घडलं

Nalasopara Hanuman Nagar Murder Case News : नालासोपाऱ्यात पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरील अश्लील कमेंटचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Nalasopara : बायकोच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून राडा; लग्नाच्या वाढदिवशीच नवऱ्यासोबत भयंकर घडलं
Nalasopara Hanuman Nagar Murder Case NewsSaam Tv
Published On
Summary
  • व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरील अश्लील कमेंटवरून वाद

  • चाकू हल्ल्यात आफताब शेख यांचा मृत्यू

  • आरोपी मेहंदी हसन शेख या सराईत गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल

  • पोलिस तपास सुरू

नालासोपाऱ्यात व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून, एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला अश्लील कमेंट करणाऱ्याला जाब विचारायला गेला म्हणून ही हत्या करण्यात आली आहे. सदर घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नालासोपारा पश्चिम इथल्या हनुमान नगरमध्ये घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आफताब शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून मेहंदी हसन शेख असे आरोपीचे नाव आहे. आफताब आणि मेहंदी हे याआधी एकमेकांचे शेजारी होते. आफताब शेख हा पत्नी शबाना शेखसोबत राहत होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. शबानाने व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नाच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले होते.

Nalasopara : बायकोच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून राडा; लग्नाच्या वाढदिवशीच नवऱ्यासोबत भयंकर घडलं
Mumbai Police Recruitment : मुंबईमध्ये पोलीस भरतीत गैरप्रकार, धावण्याच्या स्पर्धेत केली अदलाबदल, चौघांविरोधात गुन्हा

या स्टेटसला मेहंदी हसन शेख याने अश्लील कमेंट केली होती. या कमेंटचा जाब विचारायला शबाना आणि आफताब गेले होते. आफताब शुक्रवारी पहाटे हनुमान नगरमध्ये गेला होता. त्यावेळी आफताब आणि मेहंदी यांच्यात वाद झाला. याच वादातून मेहंदीने चाकूने आफताब शेखवर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या आफताबचा जागीच मृत्यू झाला.

Nalasopara : बायकोच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून राडा; लग्नाच्या वाढदिवशीच नवऱ्यासोबत भयंकर घडलं
Today Horoscope : काहींचं प्रेम बहरणार, तर कुणाला आर्थिक अडचण येणार; कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य

मेहंदी हा सराईत गुन्हेगार असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याआधीही पोक्सो गुन्ह्या अंतर्गत मेहंदीला अटक केली होती. दरम्यान काल घडलेल्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com