Mega Block : विकेंडला घराबाहेर फिरायला जात असाल तर थांबा; 'या' मार्गावर रविवारी असणार मेगा ब्लॉक, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Train Mega Block : २८ जून रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून मुख्य मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा प्रभावित होणार आहेत.
MUMBAI CENTRAL RAILWAY MEGA BLOCK ON JUNE 28: LOCAL TRAIN SERVICES DIVERTED, CANCELLED AND DELAYED
MUMBAI CENTRAL RAILWAY MEGA BLOCK ON JUNE 28: LOCAL TRAIN SERVICES DIVERTED, CANCELLED AND DELAYEDSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

  • २८ जून रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे

  • घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक तपासा

तुम्ही देखील रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडत असाल तर थांबा, आधी हे रेल्वेचं वेळापत्रक वाचा. कारण रविवारी २८ जून रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मुंबई विभागातील मुख्य मार्ग तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावर हा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून काही सेवा रद्दही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी नियोजन करून बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील.

MUMBAI CENTRAL RAILWAY MEGA BLOCK ON JUNE 28: LOCAL TRAIN SERVICES DIVERTED, CANCELLED AND DELAYED
Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

त्याचप्रमाणे, ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड स्थानकावरून जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे पुन्हा धीम्या मार्गावर येतील. या बदलांमुळे संबंधित लोकल सेवा नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने धावतील.

MUMBAI CENTRAL RAILWAY MEGA BLOCK ON JUNE 28: LOCAL TRAIN SERVICES DIVERTED, CANCELLED AND DELAYED
Pune : लोहगडावरून ढकलून केतन अग्रवालची हत्या का केली? सियाने सांगितलं हादरवणारं कारण

याशिवाय, सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या सर्व अप व डाउन लोकल गाड्यांनाही सुमारे १५ मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेहून वाशी, नेरुळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या तसेच पनवेल, नेरुळ आणि वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com