

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला धमकीचा ई-मेल आल्याचे खळबळ
मुंबईतील तीन ते चार शाळांनाही लक्ष्य करण्याचा दावा
महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातही स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख
मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देणारा धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली. ३१ ऑक्टोबर आणि २७ नोव्हेंबरला स्फोट घडवण्याची धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. मुंबईतील तीन ते चार शाळांमध्येही बॉम्ब ठेवल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबरला या शाळांना लक्ष्य करत ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याचा आणि २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांच्या नावांचा उल्लेख आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. ई-मेलची सत्यता, पाठवणाऱ्याची ओळख आणि संभाव्य धोका तपासण्याचे काम मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.
धमकीचा मेल येताच मुंबई पोलिसांनी संबंधित ठिकाणी बॉम्ब शोधक पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने तपासणी सुरू केली आहे. धमकी दिलेले हे सर्व परिसर रिकामे करण्यात आले आहेत. या ठिकाणी अद्याप संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या धकमीनंतर संबंधित ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. ई-मेल प्राप्त होताच मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या धमकीच्या ईमेलमध्ये 'मुंबई बॉम्बे बोलेगा - खलिस्तान झिंदाबाद!', असे लिहिले आहे. मुंबई महापौर कार्यालय दुपारी ३:११ वाजता आणि शाळा दुपारी १:११ वाजता उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून आपल्या मुलांना वाचवा असे देखील सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून ई-मेलची सत्यता, तो कोणी आणि कुठून पाठवला आणि हा खरा धोका आहे का? की केवळ अफवा पसरवण्याचा प्रयत्न आहे? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. महापौर कार्यालय, महालक्ष्मी रेसकोर्स आणि शाळांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खलिस्तान नॅशनल आर्मी
गुरुनानक सिंह
रुकन शाहवाला
डॉ. गुरनिर्वैर सिंह
खान राजादा
बब्बर खालसा (परमार-कॅनडा)
प्रा. गुरकाल सिंह, पीएचडी
खेम करण
प्रा. गुरंगार सिंह
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.