Mumbai Mayor election : ठाकरेंच्या मनसेचा भाजपला पाठिंबा? मुंबईत नव्या राजकीय समीकरणाची चर्चा
Mumbai Mayor election latest news : मुंबई महानगरपालिकेत भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आले आहे. भाजपला मुंबईत स्पष्ट बहुमत न आल्यामुळे महापौरपदासाठी पाठिंब्याची गरज लागणार आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून काही अटी टाकण्यात येत आहेत. त्यातच आता मनसेच्या उमेदवाराकडून भाजपला महापौरपदासाठी पाठिंबा देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने मनसेच्या उमेदवेरांसोबत चर्चा केल्याचे एका खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेय.
मनसेच्या उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिला, तर ठाकरे बंधूंमधील दुरावा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली, ठाणेसह काही मनपामध्ये मनसेने अशी भूमिका घेतली आहे. आता मुंबईत मनसेचा भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याने काही दिवसांपूर्वी तिसरा पक्ष आम्हाला पाठिंबा देईल, असे वक्तव्य केले होते. आता तिसरा पक्ष म्हणजे मनसे असू शकतो, असे सांगण्यात येत आहे. आज मनसेच्या नगरसेवकाची या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये भाजपला पाठिंबा देण्याबाबत चर्च होणार असल्याचे समजतेय.
मनसेच्या पाठिंब्याची शक्यता समोर आल्यानंतर मुंबई महापौर निवडणुकीत भाजपची मोठी खेळी करत असल्याचे बोलले जात आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे सभागृहात भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
सध्या महायुतीकडे १२१ इतकी संख्या असल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजप आणखी पाठिंबा मिळवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महापौर निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक आहेत. त्यामध्ये सर्वाधिक भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत ताकद दाखवली. तर ठाकरेंची शिवसेना ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या. तर काँग्रेस २४, मनसे ६, राष्ट्रवादी अजित पवार ३, राष्ट्रवादी शरद पवार १, एमआयएम ७ आणि समाजवादी पक्षाला २ जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित झालेय. भाजपकडून महापौरपदाच्या नावाची लवकरच घोषणा केली जाऊ शकते. भाजप कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार? याकडे देशाचे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

