Mumbai Scientist End Life : धक्कादायक! मुंबईत BARCच्या शास्त्रज्ञाने संपवलं जीवन

Mumbai News : मनिष शर्मा असं आत्महत्या केलेल्या शास्त्रज्ञाचं नाव आहे.
Crime News, washim
Crime News, washimSaam TV
Published On: 

सचिन गाड

Mumba News :

देशभरात चांद्रयान ३ च्या यशानंतर शास्त्रज्ञांचं गुणगाण गायलं जात आहे. तर दुसरीकडे BARC मधील 50 वर्षीय शास्त्रज्ञाने आत्महत्या केल्याची दु:खद घटना समोर आली आहे. आत्यहत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मनिष शर्मा असं आत्महत्या केलेल्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. मनिष शर्मा आपल्या 48 वर्षीय पत्नी सोबत राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे त्यांनी सोमवारी दुपारी 3 च्या दरम्यान आत्महत्या केली. (Latest Marathi News)

Crime News, washim
Water Storage in State : राज्यातील धरणांमध्ये केवळ ६४.७० टक्के पाणीसाठा, तुमच्या जिल्ह्यात किती पाणीसाठा उपलब्ध? पाहा लिस्ट

सूत्रांच्या माहितीनुसार, शर्मा यांनी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या साह्याने पंख्याला लटकून गळफास घेतला.पत्नीने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने ॲम्बुलन्सने बीएआरसी हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Maharashtra News)

Crime News, washim
Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव! हार्डवेअरच्या दुकानाला आग; एकाच कुटूंबातील ४ जणांचा मृत्यू

मनिष शर्मा काही तणावात होते का? मनिष यांना आत्महत्या का केली याची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र ट्रॉम्बे पोलिसांनी या प्रकरणात ADR दाखल करून पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com