Mumbai : शरीरात मेणाच्या कॅप्सूल अन् विमानतळ कर्मचाऱ्याची साथ, 13.73 कोटींचे सोने-हिरे जप्त

मुंबई विमानतळावर DRI ने 'ऑपरेशन कॅरेट नेक्सस' अंतर्गत मोठी कारवाई करत ८.५६४ किलो २४ कॅरेट सोन्याची पावडर आणि १,१६८.९७ कॅरेट हिरे असा एकूण १३.७३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
DRI
DRI
Published On: 

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) आंतरराष्ट्रीय तस्करीच्या एका मोठ्या आणि भलत्याच चलाख रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 'ऑपरेशन कॅरेट नेक्सस' (Operation Carat Nexus) अंतर्गत DRI ने ही धडक कारवाई करत तब्बल १३.७३ कोटी रुपये मूल्याचे सोने आणि हिरे जप्त केले आहेत. या हायप्रोफाईल तस्करीत सामील असलेल्या आठ जणांना अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

काय आहे 'फ्लाय-इन फ्लाय-आउट' रॅकेट?

DRI ने दिलेल्या माहितीनुसार, हे तस्कर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे चालवत होते. परदेशातून भारतात सोने आणणे आणि त्या बदल्यात भारतातून हिरे परदेशात (विशेषतः दुबईला) पाठवणे असा या रॅकेटचा मुख्य उद्देश होता. दुबई, दोहा, जेद्दा आणि फुजैराहून आलेल्या प्रवाशांचा वापर या तस्करीसाठी केला जात होता.

DRI
अचानक धनलाभ अन् नोकरीत भरभराट! केतु ३ राशींना बनवणार श्रीमंत, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

तस्करीची भयंकर मोडस ऑपरेंडी:

तपासादरम्यान तस्करांची मोडस ऑपरेंडी पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेले. आरोपींनी मेणामध्ये २४ कॅरेट सोन्याची पावडर मिसळून त्याच्या तब्बल २३ कॅप्सूल तयार केल्या होत्या. या कॅप्सूल प्रवाशांनी आपल्या शरीरात (रेक्टम/पोटात) लपवून आणल्या होत्या. विमानतळावर तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने या वस्तूंचे गुप्तपणे हस्तांतरण (Secret Hand-off) केले जात होते.

DRI
मोठी बातमी! महायुतीचा पुण्याचा तिढा सुटला, जागावाटपाचा नवा फॉर्म्युलाही समोर, राष्ट्रवादी-शिवसेनेला कोणती जागा?

जप्त केलेल्या मुद्देमालाची माहिती:

सोन्याची पावडर: ८.५६४ किलो (२४ कॅरेट) – किंमत रु. १२.६४ कोटी

नैसर्गिक व लॅब-ग्रोन हिरे: १,१६८.९७ कॅरेट – किंमत रु. १.०९ कोटी

एकूण जप्त माल: रु. १३.७३ कोटी

या प्रकरणी DRI ने तात्काळ कारवाई करत एकूण ८ जणांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com