वाढत्या प्रदूषणाचा थेट मेंदूवर हल्ला; मुंबईकरांचा श्वास गुदमरला, काळजी घ्या

Air Pollution May Increase Dementia Risk by 14%: जगात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई तिसऱ्या क्रमांकावर पोहचलीय...अशातच दिल्लीपासून मुंबईपर्यंत हवा प्रदूषणामुळे नागरिकांच्या श्वास कोंडतोय...अशातच युनिव्हसिट ऑफ बर्निंगहमनं हवा प्रदूषणामुळे मेंदूवर परिणाम होत असल्याचा दावा केलाय? मात्र खरचं या दाव्यात तथ्य आहे का? पाहूया एक खास रिपोर्ट...
MUMBAI AIR POLLUTION
MUMBAI AIR POLLUTIONsaam tv
Published On: 

श्वासावाटे आपल्या शरीरात जाणारी हवा आपल्याला आजारी तर पाडतच आहे, मात्र आता ती थेट आपल्या मेंदूवरही घाला घालत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आल आहे... प्रदूषणाच्या अतिसूक्ष्म कणांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे मेंदूचा आकार आकुंचन पावण्याचा मोठा धोका असतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. राजधानी दिल्ली असेल किंवा आर्थिक राजधानी मुंबई . वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अभ्यासानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. विशेषतः सर्वाधिक प्रदूषण असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये स्मृतीभ्रंशाचा म्हणजेच डिमेन्शियाचा धोका 14 टक्क्यांनी वाढल्याचं निष्पन्न झालं आहे.

जगात सर्वाधिक प्रदुषित शहरांत मुंबई तिसऱ्या क्रमाकांवर आल्यानं स्थानिकांची चिंता वाढलीये. मुंबईत विशेष मोहिम राबवली जाणारय. मात्र वाढत्या प्रदुषणावर विरोधीपक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी जोरदार हल्लाबोल केलाय. दुसरीकडे प्रशासनाने प्रदुषण रोखण्यासाठी कंबर कसलीय... राज्य सरकारने महापालिकांना कडक निर्देश दिले आहेत..

- मुंबई शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचे कडक निर्देश

- राज्य सरकारचे महापालिकांना प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश

- रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी स्प्रिंकलरद्वारे पाण्याची फवारणी बंधनकारक

- लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्यांवर आता नोटिशीशिवाय कारवाई

शहरातील पुढची पिढी सुरक्षितपणे जगवायची असेल तर प्रदूषण रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी जनजागृतीही महत्वाची आहे. कारण आज आपण श्वासावाटे घेत असलेली हवा पुढील काही वर्षांत आपल्या मेंदूवर कसा गंभीर परिणाम करू शकते, हे समोर आल्याने आता काळजी घेणे गरजेेचे आहे. कारण मेंदू सलामत तर पगडी पचास....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com