Darshana Pawar News: MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Darshana Pawar Death Case Updates: MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शनाचा मृत्यू घातपातामुळे झाला असा खुलासा पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला आहे.
mpsc student darshana pawar death case pune police give shocking information
mpsc student darshana pawar death case pune police give shocking informationSaam TV

Darshana Pawar Death Case Updates: MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शनाचा मृत्यू घातपातामुळे झाला असा खुलासा पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला आहे. याशिवाय पोलिसांनी सुद्धा तिच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे दर्शनाची हत्या नेमकी कुणी केली? असा सवाल उपस्थित झाला आहे. (Latest Marathi News)

मूळ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील असणाऱ्या दर्शना पवारने एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावला होता. दर्शना शालेय जीवनापासून अत्यंत हुशार आणि कष्टाळू होती. विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने अनेक बक्षीसं आणि सन्मानचिन्ह मिळवले होते.

mpsc student darshana pawar death case pune police give shocking information
Mumbai Crime News: प्रेमाचा भयानक अंत! धावत्या रिक्षातच प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलं; मुंबईतील धक्कादायक घटना

'दर्शना पवार १७ ते १८ तास अभ्यास करायची'

दर्शनाचे वडील हे एका सहकारी साखर कारखान्यात वाहनचालक म्हणून नोकरी करतात. दर्शना दररोज १७ ते १८ तास अभ्यास करत होती, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली. घरी अत्यंत हालाखीची परिस्थिती असताना वडिलांच्या मेहनतीची जाण ठेऊन दर्शना पवारने अभ्यासात स्वत:ला झोकून दिलं आणि एमपीएससीच्या (MPSC Exam) परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक मिळवला.

दर्शना पवारचा MPSC परीक्षेत सहावा क्रमांक

एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्यानंतर दर्शनाची निवड वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून करण्यात आली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ९ जून रोजी ती पुण्यात आली होती. त्यानंतर १० जुलै रोजी तिचा सत्कार देखील करण्यात आला.

सिंहगड (Pune Crime News) रस्ता भागातील नऱ्हे परिसरात असलेल्या एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत तिचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे होता.

mpsc student darshana pawar death case pune police give shocking information
Police In Marriage: लग्नघटिका समीप, अचानक पोलीस धडकले अन् नवरीला फरफटत घेऊन गेले; नवरदेव बघतच राहिला

१२ जूननंतर दर्शनाचा मोबाइल बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा थागपत्ता लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली.

दर्शना पवारसोबत काय घडलं?

रविवारी (१८ जून) सकाळी राजगड किल्ल्यावर दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. एका गुराख्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेची महातम गुराख्याला एक सडलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

दर्शना पवारच्या मित्रावर संशयाची सुई

दर्शना पवार हिचा खून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. तसंच सर्व प्रकारानंतर राहुल हंडोरे हा दर्शनाचा मित्र बेपत्ता आहे. तरुणीच्या मृतदेहाजवळ राहुलचे जर्किन सापडले आहे. मात्र, तो अद्यापही घरी आला नसून, नातेवाइकही त्याचा शोध घेत आहेत. दर्शनाची हत्या तिच्या मित्रानेच केली असावी, असा संशय आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com