Police In Marriage: लग्नघटिका समीप, अचानक पोलीस धडकले अन् नवरीला फरफटत घेऊन गेले; नवरदेव बघतच राहिला

Police Drags Away Bride Before Wedding: लग्नाआधीच अचानक पोलिस (Police) धडकले आणि नवरीला फरफटत पोलिस ठाण्यात घेऊन गेले.
Shocking News police drags away bride before wedding in kerala
Shocking News police drags away bride before wedding in kerala Saam TV
Published On

Kerala Police In Wedding News: लग्नघटिका समीप आली. वधू आणि वर दोघेही लग्नासाठी मंदिरात हजर झाले. आता बुवा मंगलअष्टक सुरू करणार तोच अचानक पोलिस (Police) धडकले आणि नवरीला फरफटत पोलिस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी नवरदेवाने मधस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यालाही ढकलून दिले. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार केरळमध्ये घडला.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वास्तविक हे प्रकरण आंतरजातीय लग्नाशी संबंधित आहे. केरळच्या (Kerala) कोवलममधील एका मंदिरात प्रेमीयुगुल गुपचूप लग्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस मंदिरात गेले आणि तरुणाच्या समोरच तरुणीला फरफटत पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

Shocking News police drags away bride before wedding in kerala
IAS Ria Dabi Marriage: आयएएस टीना डाबी यांच्या बहिणीने गुपचूप उरकलं लग्न; कोर्ट मॅरेज करत दिला सर्वांनाच धक्का

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पोलीस या तरुणीला घेऊन जात होते. तेव्हा तरुणाने मधस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला सुद्धा ढकलून दिले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

केरळमधील एका अल्फिया नामक तरुणीचे अखिल नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनीही आपल्या प्रेमाबद्दल कुटुंबियांना सांगितले. मात्र, तरुणीच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिल्याने दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अल्फिया घरातून बेपत्ता होताच, तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलिस तिचा शोध घेत होते. दरम्यान, अल्फिया आपल्या प्रियकरासोबत एका मंदिरात लग्न (Marriage) करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने धाव घेत हा विवाह रोखला.

Shocking News police drags away bride before wedding in kerala
Kalyan News: भाजप आमदाराच्या आवाजाऐवजी जोडला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज, व्हिडिओ व्हायरल

इतकंच नाही, तर पोलिसांनी यावेळी बळाचा देखील वापर केला. अल्फिया सोबत येत नसल्याने पोलिसांनी तिला अक्षरश: मंदिरातून फरफटत नेलं आणि जीपमध्ये बसवलं. अखिलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्याला मारहाण देखील केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी कोर्टात हजर करताच अल्फियाने आपल्यासोबत घडलेला प्रकार न्यायाधीशांना सांगितला. माझे वय १८ वर्ष पूर्ण असून मी माझ्या सहमतीने अखिलसोबत गेली होती. आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करत असून आमच्या लग्नाला परवानगी द्या अशी मागणी तिने केली. दरम्यान, या प्रकरणानंतर न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी पोलिसांनी खरंच बळाचा वापर केला का? याचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com