MPSC चौकशी समितीत नियुक्तीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंनीच केला मोठा खुलासा, काय म्हणाले?

Tukaram Mundhe's Appointment to MPSC Inquiry Committee Remains Unclear: एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदासाठी तुकाराम मुंढे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
MPSC INQUIRY COMMITTEE
MPSC INQUIRY COMMITTEEsaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

MPSC प्रकरणाच्या चौकशी समितीवरून आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या चौकशी आयोगात आपला सहभाग असल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचं IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात फक्त तोंडी चर्चा झाल्याचं त्यांनी मान्य केलं असलं, तरी ही चर्चा नेमकी कोणासोबत झाली, याबाबत त्यांनी स्पष्ट असे काही सांगितले नाही. तसेच, अधिकृतरीत्या आपल्याला याबाबत काहीही कळवण्यात आलेलं नसल्याचंही मुंढे यांनी सांगितलं आहे.

MPSC INQUIRY COMMITTEE
Maharashtra : महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; ७८.४९ कोटींचे अन्नपदार्थ जप्त

दरम्यान, आंदोलनावेळी खुद्द मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुकाराम मुंढे यांचं नाव चौकशी समितीचे सचिव म्हणून जाहीर केले होते. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणताही लेखी आदेश जारी झालेला नसल्याचं समोर येत आहे. त्यामुळे मुंढे यांच्या नियुक्तीबाबत संभ्रम कायम आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांमध्ये तुकाराम मुंढे यांच्याबाबत मोठी क्रेझ आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचं लक्ष या चौकशी समितीकडे लागलं आहे.

MPSC INQUIRY COMMITTEE
सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं!

एकीकडे मंत्र्यांकडून तुकाराम मुंढे यांचं नाव चौकशी समितीच्या सचिवपदासाठी जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे मुंढे यांनी अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चौकशी समितीतील त्यांचा सहभाग, नियुक्तीची अधिकृत प्रक्रिया आणि लेखी आदेश कधी जारी होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेले अनेक दिवस पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. काही विद्यार्थी हे उपोषणाला देखील बसले होते.

MPSC INQUIRY COMMITTEE
Maharashtra : ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार! ६ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

तसेच MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून हटवावे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. तर चौकशी समितीमध्ये तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली जाईल असे आश्वासन मंत्र्यांकडून देण्यात आले. मात्र याबाबतचा लेखी आदेश कधी येणार असा प्रश्न तुकाराम मुंढे यांच्या प्रतिक्रियेनंतर उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com