Navneet Rana News : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवीन राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहे, असं राज्य सरकारच्या वतीने कोर्टात सांगण्यात आलंय. (Latest Marathi News)
मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणातील आमच्या विरोधातील गुन्हा रद्द व्हावा अशी मागणी, राणा दाम्पत्याने केली होती. दाखल केलेली याचिका खोट्या एफआयआरवर दाखल होती, असा दावा राणा दाम्पत्याकडून करण्यात आला होता. हा दावा पोलिसांनी फेटाळला आहे.
साक्षीदार शासकीय कर्मचारी आहेत. सीआरपीसी कलम ३१३ नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे, असे पोलिसांनी (Police) न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता या प्रकरणी २८ एप्रिला पुढील सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असताना अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी मुंबई गाठले होते.
यानंतर मोठा राडा झाला होता. याप्रकरणी या दोघांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईतील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. याशिवाय नवनीत राणा या सुद्धा खासदार असल्याने त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.