MNS Leader Amit Thackeray Viral Video
MNS Leader Amit Thackeray Viral VideoFacebook/@GajananKaleOfficial

Amit Thackeray: जेवणाचं ताट स्वतःच वाढून घेतलं; अमित ठाकरेंच्या साधेपणाने जिंकलं मनसैनिकांचं मन, पाहा Video

MNS Leader Amit Thackeray Pune Visit : पुण्यातील एका पदाधिकाऱ्याच्या घरी आले असून ते स्वतः जेवणाचं ताट वाढून घेताना आणि जमिनीवर बसून जेवताना दिसत आहेत.
Published on

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) हे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पक्षवाढीसाठी ते राज्यभर दौरे करतायत. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान अमित ठाकरे पुण्यात (Pune) होते, यावेळी मनसैनिकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं होतं. दरम्यान अमित ठाकरेंच्या अनेक दौऱ्यांमधून त्यांचा साधेपणा दिसला आहे. कधी ते मुंबई लोकलने प्रवास करताना दिसले, तर कधी एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जेवताना दिसले. अमित ठाकरेंचा पुन्हा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अमित ठाकरे हे पुण्यातील एका पदाधिकाऱ्याच्या घरी आले असून ते स्वतः जेवणाचं ताट वाढून घेताना आणि जमिनीवर बसून जेवताना दिसत आहेत. (Amit Thackeray Latest News)

हे देखील पाहा -

दोन दिवसांपुर्वी मनसे नेते अमित ठाकरे उत्तर पुणे जिल्ह्याच्या संवाद यात्रेच्या दौऱ्यावर असताना राजगुरुनगर येथे अमित ठाकरेंचा साधेपणा पुन्हा दिसून आला आहे. मनसेच्या संवाद यात्रेदरम्यान मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांच्या घरी ते जेवणासाठी आले. यावेळी अमित ठाकरे यांनी चक्क किचनमध्ये जाऊन स्वतः ताट हातात घेत जेवण वाढून घेतले आणि आपण आपल्या जीवनात स्वतःची कामे स्वतः कशी करावी असाच जणू संदेश दिलाय. एवढंच नाही, तर ते जेवणासाठी जमिनीवर बसले आणि सर्वांसह सामुहिकरीत्या भोजनाचा आस्वाद घेतला.

MNS Leader Amit Thackeray Viral Video
MNS Pune: अमित ठाकरेंचं पुण्यात जोरदार स्वागत; पक्षबांधणीसाठी ३ दिवसांचा पुणे दौरा

अमित ठाकरेंचा साधेपणाने जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होतोय. "कुठलाही बडेजाव नाही, कुठला लवाजमा नाही, पाय जमिनीवर ठेवून कायम आपला साधेपणा जपणारा माझा नेता..." असं म्हणत मनसेचे नेते गजानन काळे यांनी हा व्हिडिओ शेयर केला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर अमित ठाकरेंनी आपला पुणे दौराही पूर्ण केला आहे. राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या संघटनात्मक बांधणीवर जास्त लक्षं देतायत. त्यासाठी ते राज्यातील अनेक भागांत फिरतायत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्कअभियानासाठी ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com