सचिन जाधव
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या पुणे (Pune) संपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मनसे (MNS) नेते हे अमित ठाकरे ३ दिवस पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. आज, शुक्रवारी त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देत अमित ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी १५ फुटांहून मोठा हार घालत कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आले आहेत. (Pune MNS Latest News)
हे देखील पाहा -
महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा आखण्यात आला आहे. तसेच अमित ठाकरे सगळ्या मतदार संघात जाऊन पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. पुण्यात ८ आणि शिरुरमधील ५ मतदार संघात जाऊन अमित ठाकरे तिथल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या कालावधीत ते महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात त्यांचा दौरा असेल.
राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या संघटनात्मक बांधणीवर जास्त लक्षं देतायत. त्यासाठी ते राज्यातील अनेक भागांत फिरतायत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्कअभियानासाठी ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
अमित ठाकरे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष देत आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरु आहे. त्यानुसार ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला होता. राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून तेही पक्षाच्या कार्यक्रमांत सक्रिय होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.