Raj Thackeray Latest News: समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवलं, आभार; पण.... राज ठाकरेंनी पुन्हा दिला हा इशारा

Raj Thackeray Thanks to BMC Administration : राज ठाकरे यांनी पत्र लिहित मुंबई महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
Raj Thackeray On Mahim Dargah
Raj Thackeray On Mahim DargahSaam TV
Published On

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीचा मुद्दा उपस्थित केला होता. राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासनाकडून रात्रीच आदेश निघाले. त्यानंतर सकाळी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. राज ठाकरे यांनी पत्र लिहित मुंबई महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. (Latest Marathi News)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पत्र जसेच्या तसं

सस्नेह जय महाराष्ट्र!

धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. (Raj Thackeray Latest News)

Raj Thackeray On Mahim Dargah
Uddhav Thackeray News: चोराला चोर म्हणणे...; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल ,सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.

आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं! (Maharashtra Latest News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com