...तरीही आशाताई खचल्या नाहीत; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

raj thackery on asha bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोस्ट केली. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
raj thackeray news
raj thackeray Saam tv
Published On
Summary

आशा भोसले यांचं निधन झालं

आशा भोसले यांच्या निधनानंतर मनोरंजन आणि राजकीय वर्तुळात शोककळा

आशाताईंच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनानंतर मनोरंजन आणि राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली.

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालंय. माझ्या एक २ भाषणांमध्ये आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी मंगेशकर आणि तुम्ही भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडं बघताना त्याच्या कामातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीवपणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहतं. ते दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं. तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे.

त्यांच्या कामात आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरीपाणा देखील आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतूर आहेत, असं वाटत राहतं. तसंच आशा भोसले यांच्या गाण्यांचं आहे. त्यांच्या गाण्यात ओढ, खेळकरपणा, धिटाई आहे. तसेच माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच. ते सगळं त्यांच्या गाण्यात जाणवत राहतं.

raj thackeray news
आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली; बड्या महिला नेत्याचा खळबळजनक दावा

'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळून येतात. तसं म्हणण्याची मुभा नियतीने आशा भोसले यांना कधीच दिली नाही. त्यांनी वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. त्यांनी या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताई यांनी अफाट त्रास सहन केलाय. परंतु त्रास किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतु परंतुवर मात केली. तीच धिटाई त्यांच्या आवाजात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com