आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली; बड्या महिला नेत्याचा खळबळजनक दावा

Aditya Thackeray Sanjay Raut Fight Controversy: आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांची कॉलर पकडल्याचा शितल म्हात्रे यांचा खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Shital Mhatre’s explosive claim about Aditya Thackeray and Sanjay Raut sparks fresh political controversy in Maharashtra.
Shital Mhatre’s explosive claim about Aditya Thackeray and Sanjay Raut sparks fresh political controversy in Maharashtra.Saam Tv
Published On

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा आता शिंदेगटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी केला आहे. आज सकाळपासूनच शितल म्हात्रे आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये ट्विटरवार सुरू असून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे. महाविकासआघाडीकडून राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजीचा सुर उमटला होता. तसेच राज्यसभेवर जाण्यासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्यावरुन संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे सांगितले जात आहे. आता यावरच शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांची कॉलर पकडल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

Shital Mhatre’s explosive claim about Aditya Thackeray and Sanjay Raut sparks fresh political controversy in Maharashtra.
पेट्रोल डिझेल तुटवडा, पंपांवरच्या लांबलचक रांगा...CM फडणवीसांनी दिला थेट इशारा अन् सांगितलं महाराष्ट्राचं वास्तव

काय म्हणाल्या शितल म्हात्रे?

ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला. आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा? त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे. ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्नं आता सोडून द्या. मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही असे शितल म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत.

राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा Self Goal केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते. विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोरे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शितल म्हात्रे. म्हात्रे काय गोरे काय... यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत... दोघींनाही प्रेमळ सल्ला.. आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका...! असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com