Raj Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व; राज ठाकरेंची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले? वाचा

Raj thackeray on rss : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खास पोस्ट केली आहे. यावेळी राज ठाकरेंनी संघाचं कौतुक केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व; राज ठाकरेंची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले? वाचा
Raj ThackeraySaam tv
Published On

मुंबई : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने शतकोत्तर वर्षात पदार्पण केलं आहे. आज १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने विजयादशमी उत्सव साजरा केला. नागपुरात भरपावसात स्वयंसेवकांनी सोहळ्याला हजेरी लावली. संघाच्या सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतकोत्तर वर्षात पदार्पण केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट केली आहे.

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, 'आज शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन आहे. संघाने ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं आहे. यासाठी प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन करतो. भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत. हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा, यासाठी गेली ९९ वर्ष राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे'.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व; राज ठाकरेंची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले? वाचा
Raj Thackeray: 'ही क्रांतीची, वचपा घेण्याची वेळ, अपमान करणाऱ्यांचा वेध घ्या..' राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन!

'मला राष्ट्रीय स्वंयसेवक संघांचं काम कायमच अचंबित करतं. देशात एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यावर तात्काळ धावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे असतो. हे अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक आणि प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणे आणि तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणे यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो, याचा तपशील मला माहीत आहे, असे ते पुढे म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व; राज ठाकरेंची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले? वाचा
Raj Thackeray : महाराष्ट्राचा खेळ झाला, कुणी विदूषक चाळे करतंय, कोण मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारतंय- राज ठाकरे

'एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपी गोष्ट नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत की, एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल. तसेच तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल. संघ कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा आहेत. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com