दिल्ली, ता. २५ सप्टेंबर
Arvind Kejriwal Letter TO RSS Chief: मद्यघोटाळ्यातील आरोपांनंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तसेच आतिशी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जंतर-मंतरवर आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात भारतीय जनता पक्ष तसेच आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला होता. आता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहले आहे. या पत्रामधून त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबतचा नियम मोदींना का लागू होत नाही? असा सवाल करत ५ महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.
१. 'तुम्ही सर्वांनी मिळून एक कायदा केला की भाजप नेते वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्त होतील. या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला आणि या कायद्यानुसार अडवाणी जी आणि के मुरली मनोहर जोशीजी सारखे भाजपचे प्रमुख नेते निवृत्त झाले. आता अमित शहा म्हणतात तो कायदा मोदीजींना लागू होणार नाही? तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कायदा सर्वांना समान करायला हवा ना?' असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
२. '28 जून 2023 रोजी मोदीजींनी एका जाहीर भाषणात एका पक्षावर आणि त्यांच्या नेत्यावर 70 हजार रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि काही दिवसांनी त्या नेत्याने सरकार स्थापन केले, ज्याला कालपर्यंत भ्रष्ट म्हटले जायचे. त्यांना उपमुख्यमंत्री केले. अशी अनेक प्रकरणे आहेत. जेव्हा इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांचा पक्षात समावेश करण्यात आला. अशा भाजपची कल्पना केली होती का? हे सगळं बघून तुम्हाला वेदना होत नाहीत का?" असे म्हणत अजित पवार यांच्या प्रवेशावरुन नाव न घेता टोला लगावला आहे.
३. 'इतर पक्षांच्या नेत्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून किंवा ईडी-सीबीआयच्या धमक्या देऊन देशभरात त्यांचा पराभव केला जात आहे. त्यांचे पक्ष फोडले जात आहेत आणि इतर पक्षांची सरकारे पाडली जात आहेत. अशा प्रकारे निवडून आलेली सरकारे पाडणे देशाच्या लोकशाहीसाठी योग्य आहे का? कोणत्याही अप्रामाणिक मार्गाने सत्ता मिळवणे तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे का? असाही सवाल केजरीवाल यांनी केला आहे.
४. 'भाजप हा RSS च्या पोटी जन्माला आलेला पक्ष आहे. भाजपचा भ्रमनिरास झाल्यास त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी आरएसएसची आहे. तुम्ही कधी पंतप्रधानांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखले आहे का?' असेही अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
५) जेपी नड्डा म्हणाले की, भाजपला आरएसएसची गरज नाही. एकप्रकारे आरएसएस ही भाजपची आई आहे, त्यामुळे आईला डोळे दाखवण्याइतपत मुलगा मोठा झाला आहे का? मला समजते की नड्डाजींच्या या विधानाने प्रत्येक संघ कार्यकर्ता खूप दुखावला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे तुमच्या हृदयाला काय झाले हे देशाला जाणून घ्यायचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.