कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

Methi Vegetable Ban Sparks Controversy: भाईंदरमध्ये डब्यात मेथीची भाजी आणल्यानं विद्यार्थ्याला दंड ठोठावण्यात आलाय. मेहतांच्या शाळेतील अजब प्रकारानंतरही विद्यार्थ्यांच्या डब्यावरून सुरू झालेला वादाचा सिलसिला कायम आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील स्थानिक राजकारणही पुन्हा तापलंय... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Mira Bhayandar school student fined
Mira Bhayandar school student finedsaam tv
Published On

जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वावरून भाईंदरमध्ये पुन्हा वाद पेटलाय. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या शाळेनंतर आता भाईंदरमधील तपोवन विद्यालयाचा उरफाटा कारभार समोर आलाय. डब्यात मेथीची भाजी आणल्यानं विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. एव्हंढच नव्हे तर विद्यार्थ्याला त्याचा डब्बाही खायला दिला नाही. शाळेतील कॅन्टीनमधील दुसरा पदार्थ घेऊन त्याला खायला लावला... या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरलीय.

तर दुसरीकडे, मनसेच्या तक्रारीनंतर मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागानं शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावलीये. तर या प्रकरणावरून महाराष्ट्र एकीकरण समितीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच साद घातलीये... पर्युषण पर्वाच्या नावाखाली मीरा-भायंदरमध्येच हे वारंवार घडतंय. याच तपोवन विद्यालयात पर्युषण पर्वादरम्यान डब्यात कांदे, बटाटे, आले, बीट आणि गाजर यांसारखे अन्नपदार्थ आणू नका, असा फतवा काढला. या फतव्याचं उल्लंघन केल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांला दंड ठोठावत तुलघकी कारभार केला. यानंतरही शाळेच्या मुख्याध्यापिकेची मुजोरी कमी झालेली नाही. तर शिक्षण खातं कारवाई करणार असल्याचे संकेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आहेत.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीला हरताळ फासून विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यावर घाला घातला जातोय. मुळात मेथी सारख्या हिरव्या भाज्या मुलांना खाऊ घालण्याचा आग्रह डॉक्टरांक़डून पालकांना धरला जातो. मात्र पर्युषण पर्वाच्या आडून विद्यार्थ्यांचे डब्बे चेक करून मुलांच्या डोक्यात नेमकं काय भरलं जातंय.

वारंवार घडत असलेल्या अशा संतापजनक घटनांना कायदेशीर आळा पायबंद घालायला गवा. कारण मीरा -भाईंदरमधील शैक्षणिक संस्था या धर्मशाळा बनत चालल्या आहेत का? असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com