TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

mumbai crime news : TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवल्याचे प्रकरण उघडकीस आलं आहे.
TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं
Published On
Summary

नाशिक टीसीएस प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार

अल्पवयीन मुलीला पळवल्याची घडली धक्कादायक घटना

कथित अपहरणाच्या घटनेने परिसरात उडाली खळबळ

मयूर राणे, साम टीव्ही

नाशिकमधील टीसीएस प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. टीसीएस प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. नाशिक प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू असताना मुंबईच्या भांडूपमधूनही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भांडूपमध्ये अल्पवयीन तरुणीच्या कथित अपहरणाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये चर्चेत आलेल्या कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता मुंबईच्या भांडूपमधील परिसरातूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खिंडिपाडामधील १६ वर्षीय हिंदू तरुणीला २१ वर्षीय तरुणाने प्रेमाच्या बहाण्याने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आलाय.

कथित अपहरण प्रकरणाची ही घटना बहिणीला कळाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथके तैनात केली आहेत. मात्र आठ दिवस उलटूनही तपासात अपेक्षित प्रगती दिसून न आलेली नाही.

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं
Nashik : नाशिक टीसीएस प्रकरणातील धक्कादायक ट्वीस्ट, आरोपीचं दिल्ली ब्लास्टमधील आरोपीसोबत कनेक्शन?

राष्ट्रवादीच्या नेत्या मनीषा तुपे यांनी परिमंडळ ७ चे उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांची भेट घेतली. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रकरणात तातडीने कारवाई व्हावी आणि मुलीचा सुरक्षित शोध लागावा, अशी मागणी मनीषा तुपे यांनी केली आहे.

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं
Nashik Shocking : TCS धर्मांतर प्रकरणानंतर आणखी एक भयानक कांड; तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली अन् दारू पाजून केला बलात्कार

नाशिकच्या टीसीएस कंपनीत महिला आयोगाचं पथक दाखल

TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच पथक TCS कंपनीत दाखल झालं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून सलग दुसऱ्या दिवशी प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू आहे. पीडित महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि जबाब जाणून घेतल्याची माहिती हाती आली आहे. या कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण करत मानसिक त्रास देऊन त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत नाशिकमध्ये धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com