Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra FadnavisSaam TV

Bacchu Kadu On Devendra Fadnavis: 'फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच शिंदे सरकारमध्ये सामिल झालो', बच्चू कडूंनी भर सभेत सांगितलं गुपित

Shinde-Fadnavis Government: पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याणकारी योजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Published on

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

Pimpari Chainchwad News: 'शिंदे सरकारमध्ये (Shinde Government) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून सामिल झाल्याचं गुपित आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी आज उलगडले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याणकारी योजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या जाहीर कार्यक्रमातच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होण्यामागचे कारण सांगितले आहे.

Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Maharashtra Fourth Women Policy: महिलांसाठी महत्वाची बातमी; राज्यात चौथं महिला धोरण येणार; अजित पवारांची मोठी घोषणा

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवहाटीला जाण्याअगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं.', असा खुलासा आमदार बच्चू कडू यांनी भर सभेत केला आहे. तसंच, 'माझ्या दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय केलं तरच मी तुमच्यासोबत येतो असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं आणि त्यांनी त्या गोष्टीला होकार दिला होता.', असे बच्चू कडू म्हणाले.

Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Shahapur News: पिकनिक जीवावर बेतली! धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू, शहापूरमधील घटना

त्यांनी पुढे असे देखील सांगितले की,'50 खोके आणि गद्दार म्हणून आम्ही बदनाम झालो. परंतु, मला त्याचं काही वाटत नाही. कारण दिव्यांग मंत्रालय झालंय. शिवाय अनेक जण मंत्री पद मागत होते. मला मंत्रालयच भेटलं. आता मंत्रिपदाचं काय काम आहे.' असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. त्यामुळे एकंदरीत मंत्रीपदावरून बच्चू कडू हे नाराज नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Chandrayaan-3 Explainer : चांद्रयान ३ ची दक्षिण ध्रुवावरच लँडिंग का?

यावेळी बच्चू कडू यांनी कांदाप्रश्नावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. 'केंद्र सरकार केवळ सत्ता टिकवण्याचा विचार करत आहे. सरकार नामर्दासारखे वागत आहे. केवळ सत्तेसाठी ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार केला जातो. मग पिकवणाऱ्या विचार का केला जात नाही. सरकारने ही नालायक वृत्ती सोडली पाहिजे, अशा शब्दात बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com