Milk Price Hike : महंगाई डायन...! सर्वसामान्यांना मोठा झटका; दूध दरात २ रुपयांची वाढ

Milk Price Hike in Pune : महागाईची पुन्हा एकदा मोठी झळ बसणार आहे. कारण दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
Milk Price Hike
Milk Price HikeSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

सर्वसामान्यांना महागाईने पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी)ने दूध दरात वाढ केली आहे. कात्रज डेअरीने दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या वाहतूक आणि इतरद खर्चात वाढ झाल्यान दूध विक्रीदर वाढवण्यात आल्याचे संघाने सांगितलं आहे.

दूध उत्पादक संघाच्या निर्णयानंतर आज सोमवारी मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितलं आहे. डेअरीने मे महिन्यात फुल क्रीम दूध आणि प्रमाणित दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे टोण्ड दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Milk Price Hike
Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमच्या दिराचा खळबळजनक आरोप, नेमकं काय म्हणाला?

मे महिन्यात टोण्ड दूधाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली नव्हती, असं डेअरी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, आता वाढ केल्याने पुणेकरांच्या खिशाला प्रति लिटरप्रमाणे दोन रुपयांची झळ बसणार आहे.

Milk Price Hike
Pune Waterfall : पुण्यातील कधी न पाहिलेले ६ धबधबे; फोटो पाहून मन आनंदून जाईल

दूध प्रकार----जुने दर----नवीन दर

टोण्ड दूध (१ लिटर)--५५रुपये--५७रुपये

टोण्ड दूध (अर्धा लिटर)--२८रुपये--२९रुपये

टोण्डदूध(पाव लिटर)--१३रुपये--१४ रुपये

------------------

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी गुजरात सहकारी दूध संघाने म्हणजेच अमूलनेही दूधाच्या विक्री दरात वाढ केली होती. त्यामुळे अमूलच्या दूध पिशवीची किंमत प्रति लिटर २ रुपयांनी वाढली होती. १ मेपासून नवीन किंमती लागू झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com