

मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी
२५०० घरांसाठी निघणार सोडत
या प्राइम लोकेशनवर निघणार सोडत
मुंबईत घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. मुंबईत घर घ्यायचं म्हटलं तर घराच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशा परिस्थितीतही म्हाडा मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आता म्हाडाच्या घरांसाठी लवकरच सोडत निघणार आहे.
२५०० घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery for 2500 Houses)
एप्रिल २०२६ मध्ये मुंबईतील म्हाडाच्या सुमारे २५०० घरांसाठी संगणकीय सोडत काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, म्हाडाच्या सोडतीची जाहिरात मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला जाईल. यानंतर एप्रिल अखेरपर्यंत अंतिम सोडत जाहीर केली जाईल.
कुठे निघणार सोडत? (Mhada Mumbai Lottery Locations)
मुंबई मंडळाच्या घरांची सोडत गोरेगाव, मुलुंड, चेंबूर आणि विक्रोळी येथे निघणार आहे.याबाबत मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी १२२१ घरे आहेत. गोरेगाव पत्राचाळमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी ८५ घरांसाठी सोडत निघणार आहे. या सोडतीत मागाठाणे, विक्रोळी, सायन प्रतिक्षा नगर येथील घरांचा समावेश आहे. या घरांच्या किंमती बाजारपेठेपेक्षा कमी आहेत.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर महिन्याभरात तुम्हाला घरांसाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर लॉटरी जाहीर केली जाईल. २०२४ च्या सोडतीत या घरांच्या किंमती खूप वाढल्याने सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये एवढी मोठी सोडत निघाली नव्हती. परंतु आता खूप दिवसांनी २५०० घरांसाठी सोडत निघाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.