Mhada Mumbai Lottery: मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; 2640 सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर

Mhada Mumbai Lottery: म्हाडा मुंबईने सर्व उत्पन्न गटांसाठी 2640 फ्लॅट्सची लॉटरी जाहीर केली आहे. तुमच्या स्वप्नातील घरासाठी अर्ज कसा करावा, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे, हे जाणून घ्या.
Mhada Mumbai Lottery:
MHADA announces Mumbai lottery for 2,640 flats, offering hope to thousands of homebuyers.saam tv
Published On
Summary
  • म्हाडाकडून २६४० घरांसाठी लॉटरी जाहीर

  • सर्व उत्पन्न गटांसाठी संधी उपलब्ध

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईत घर घ्यायचंय,पण वाढत्या किंमतीमुळे तुम्ही तुमचा प्लॅन बदलत आहात का? पण आता मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पुर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे विविध उत्पन्न गटातील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.

Mhada Mumbai Lottery:
Gas Cylinder: गुड न्यूज! ३०० रुपयांनी स्वस्त मिळतोय गॅस सिलिंडर, कुठे अन् कसा मिळवायचा?

मुंबई मंडळातर्फे मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांसाठी ही सोडत असणार आहे.

ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला उद्या म्हणजेच दि. ३० मार्च, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून सुरूवात होणार आहे. या सोडतीची जाहिरात दि. ३० मार्च, २०२६ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात सदनिका सोडत प्रक्रियेबाबत माहिती देणारी पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

Mhada Mumbai Lottery:
Gold-Silver Price: सोनं २४५२९, तर चांदीचे दर ६८२१० रुपयांनी घसरले, महिन्याभरात दरात मोठी पडझड

महत्त्वाच्या तारखा

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते होईल. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी ०३.०० वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २९ एप्रिल, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. तर ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे.

आरटीजीएस/एनईएफटीद्वारे दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रकमेचा भरणा करता येईल. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक ०५ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केले जाणार.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक ०८ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुदत असेल.

सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी १२ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत करण्यात येईल. दि. १५ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सोडत काढली जाणार. सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे नंतर जाहीर केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com