म्हाडाच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; मुंबईसह महाराष्ट्रात १३०१२ घरे बांधणार

MHADA Housing Scheme 2026 Maharashtra Full Details: म्हाडाचा 2026-27 चा ₹17,430 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. राज्यभरात 13,012 घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून मुंबईत 2,538 घरांची योजना आखली आहे.
MHADA announces ₹17,430 crore budget for 2026-27, aiming to build over 13,000 affordable homes across Maharashtra.
MHADA announces ₹17,430 crore budget for 2026-27, aiming to build over 13,000 affordable homes across Maharashtra.Saam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या 17,430.73 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. या अर्थसंकल्पात राज्यभरात एकूण 13,012 सदनिकांचे बांधकाम करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेसाठी बांधकाम खर्चाकरिता 10,585.12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विविध प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरे उभारली जाणार आहेत.

MHADA announces ₹17,430 crore budget for 2026-27, aiming to build over 13,000 affordable homes across Maharashtra.
Bullet Train News | बुलेट ट्रेनचं 250 किलोमीटरचं बांधकाम पूर्ण

मुंबई मंडळाअंतर्गत 2,538 सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित असून, यासाठी 6,747.42 कोटी रुपयांची तरतूद आहे. कोकण मंडळात सर्वाधिक 5,112 घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी 1,497.64 कोटी रुपये राखीव आहेत. नागपूर मंडळात 2,008 घरे (1,206.19 कोटी), छत्रपती संभाजीनगर मंडळात 1,483 घरे (258.32 कोटी), अमरावती मंडळात 969 घरे (59.98 कोटी), पुणे मंडळात 665 घरे (664 कोटी) आणि नाशिक मंडळात 237 घरे (151.57 कोटी) बांधण्याचे नियोजन आहे.

MHADA announces ₹17,430 crore budget for 2026-27, aiming to build over 13,000 affordable homes across Maharashtra.
Congress controversy : 'तुझा ब्लाऊज फाड...' काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; व्हिडिओ व्हायरल

तसेच, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळासाठी 2,711.95 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळासाठी 661.73 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com