Kalyan News: औषधाच्या दुकानाला पोलीस अधिकाऱ्याचे नाव; फलकाची शहरात जोरदार चर्चा

Kalyan News: कल्याणमध्ये मात्र एका मेडिकल व्यावसायिकाने एका पोलीस अधिकाऱ्याच्या नाव औषधाच्या दुकानाला दिले आहे. या दुकानाच्या फलकाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On: 

अभिजीत देशमुख

Kalyan News: देशात कुठेही महापुरुष, देव-देवता,आई वडील,मुलांच्या नावाने दुकाने सुरु केली जातात. कल्याणमध्ये मात्र एका मेडिकल व्यावसायिकाने एका पोलीस अधिकाऱ्याच्या नाव औषधाच्या दुकानाला दिले आहे. या दुकानाच्या फलकाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये मेडिकल शॉपला चक्क बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचं नाव देण्यात आले आहे. सुनील पवार हे निष्ठावान,कर्तव्यदक्ष व माणुसकी असलेले पोलिस अधिकारी आहेत. एक चांगला माणूस असल्याने हे नाव दिल्याची माहिती व्यावसायिक शहानवाज मोमीन यांनी सांगितले. शहरात या नावाची चर्चा शहरात रंगली आहे.

Kalyan News
Ahmednagar News: देशविरोधी देत होते घोषणा, शिवसेनेच्या युवा नेत्याने भर कोर्टात दिला चोप

पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात अंतर वाढत असून पोलिसांबद्दल अनामिक भीती नागरिकांच्या मनात असल्याचे बोलले जाते. कल्याणमध्ये मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने काम करण्याच्या पद्धतीने नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल आदर भावना निर्माण झाल्याचे दिसून येते.

कल्याणमध्ये राहणारे शहानवाज मोमीन हे व्यावसायिक आहेत. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांचा गाळा आहे. शहानवाज मोमीन हे त्याठिकाणी मेडिकल शॉप सुरु करणार आहे. त्यांनी या दुकानाचे नाव 'श्री. सुनिल पवार' असे दिलं आहे. सुनिल पवार हे बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आहेत.

Kalyan News
Mumbai News : पत्नीची वार्षिक कमाई ९० लाख; पतीकडून १० हजार रुपये पोटगीचा आदेश सेशन कोर्टाकडून रद्द

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकरी म्हणून त्यांची ओळख आहे. कल्याणमधील व्यावसायिक शहानवाज मोमीन यांनी सुनिल पवार यांच्या कामगिरी आणि त्यांची माणुसकी पाहून दुकानाला त्यांचे नाव दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.