Mumbai Fire : मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात रहिवासी इमारतीला भीषण आग

सायन कोळीवाडा परिसरात रहिवासी इमारतीला भीषण आग
Mumbai Fire
Mumbai FireSaam Tv

Mumbai Fire News : मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या सहाव्या माळ्यावर ही आग लागली असून अग्निशमन दलच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Mumbai Fire
Bharat Jodo Yatra : 'जम्मू कश्मीरने मला हँड ग्रेनेड नाही, प्रेम दिले', राहुल गांधींचं समाप्तीचं भाषण

सायन कोळीवाडा येथील 19 मजली इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ओम शिवशक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग (Fire) लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एक जंबो वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिका (Hospital) घटनास्थळी दाखल झाली. सायन (Sion) कोळीवाडा परिसरात एमए रोडवर ही इमारत आहे.

Mumbai Fire
Kangana-Urfi War: 'पठान' चित्रपटावरून उर्फी - कंगना भिडल्या, PM मोदींचाही केला वादात उल्लेख

अग्निशमन अधिकार्‍याने सांगितले की, आग इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, घरगुती वस्तू इत्यादींपर्यंत मर्यादित होती. निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 612 फ्लॅटमध्ये ही आग लागली. ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com