Kangana-Urfi War: 'पठान' चित्रपटावरून उर्फी - कंगना भिडल्या, PM मोदींचाही केला वादात उल्लेख

कंगनाने केलेल्या ट्विटवर उर्फीने पलटवार केला आहे.
Kangana-Urfi
Kangana-UrfiSaam TV
Published On

Kangana-Urfi Twitter War On Pathaan: 'पठान' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने भारतात ३०० करोड तर जगभरात ५०० करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'पठान' चित्रपटाने बाहुबली २ आणि केजीएफ २ या दोन्ही हिट चित्रपटांना मागे टाकले आहे. 'पठान' चित्रपटाचे हे सर्व कलेक्शन अवघ्या ५ दिवसात झाले आहे.

शाहरुख चाहते त्याच्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट पाहण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत. अख्ख चित्रपटगृह बुक करणे, अगदी १० हजाराला चित्रपटाचे तिकीट खरेदी करणे. चित्रपट बघण्यासाठी बिहारहून बंगालला पायी चालत जाणे, असे अनेक उद्योग शाहरुखचे फॅन करत आहेत. चित्रपटाला बॉयकॉट करावे अशी मागणी करणारे जरी थंडावले असले तरी कंगना रनौत मात्र चांगलीच पेटली आहे.

Kangana-Urfi
Virender Sehwag On Pathan: सेहवागच्या 'पठान'वरील पोस्टवर नेटकरी भडकले, अनेकांनी तर वीरुला Unfollowच केलं

कंगना रनौत नेहमीच वाद ओढावून घेत असते. बॉलिवूडमधील अनेकांचा रोष तिने ओढावून घेतला आहे. म्हणूनच तिला पंगा क्वीन म्हणतात. आता या पंगा क्वीनशी उर्फी जावेदने पंगा घेतला आहे. कंगनाने ट्विटरवर एक ट्विट केले आहे. कंगनाने केलेल्या ट्विटवर उर्फीने उत्तर दिले आहे.

निर्माती प्रिया गुप्ताने चित्रपटगृहातील एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक 'झुमे जो पठान' हे गाणे लागताच मोबाईल लाईट लावून करून त्यावर नाचत होते.

प्रियाने हा व्हिडिओ ट्विट कर लिहिले होते की, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण तुमच्या पठाण चित्रपटाच्या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन. पहिलं, हे सिद्ध होते की हिंदू आणि मुस्लिम दोघेही SRK वर तेवढेच प्रेम करतात आणि दुसरे म्हणजे, बॉयकॉट वादामुळे चित्रपटाचे नुकसान झाले नाही तर त्याला मदत झाली आहे. तिसरे म्हणजे, इरोटिका आणि संगीताचा चांगला वापर करण्यात आला आहे. चौथा म्हणजे भारत सुपर सेक्युलर आहे. कंगनाने यावर उत्तर दिले आहे.

प्रियाच्या हे ट्विट रिट्विट करत कंगनाने लिहिले आहे की, खूप छान विश्लेषण... या देशाने फक्त आणि फक्त खान आणि खानांवर प्रेम केले आहे. मुस्लिम कलाकारांना सहकार्य केलं आहे. म्हणूनच भारतावर द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे... जगात भारतासारखा देश नाही'. कंगनाच्या या ट्विटवर उर्फी जावेदनेही उत्तर दिले आहे. उर्फी जावेदने रिट्विट करत लिहिले की, 'ओ माय गॉश! ही काय विभागणी आहे, मुस्लिम कलाकार, हिंदू कलाकार. धर्माच्या नावावर कलेची विभागणी होत नाही. इथे फक्त कलाकार आहेत.'

उर्फीच्या या ट्विटनंतर कंगना थोडीच गप्प बसणार होती. उर्फीच्या ट्विटला उत्तर देताना कंगनाने लिहिले, 'हो माझ्या प्रिय उर्फी, हे एक आदर्श जग असेल, परंतु जोपर्यंत आपल्याकडे समान नागरी कायदा नाही तोपर्यंत हे शक्य नाही. जोपर्यंत या देशाची राज्यघटनेची वाटणी होत नाही तोपर्यंत देश विभक्तच राहणार. 2024च्या जाहीरनाम्यात आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे समान नागरी संहितेची मागणी करूया. आपण हे करू शकतो का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com