अ‍ॅप इंग्रजीत मग इंग्रजीतच बोलायचं, माजोरडा कॅबचालक आता मनसेच्या रडारवर

Cab Driver Forces Marathi Passenger To Speak English Over OTP: परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं सक्तीचं केल्यानंतरही त्यांनी मराठी शिकणं तर दूरच.. मात्र मराठी प्रवाशालाच इंग्रजी बोलण्याची सक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. नेमका कुठं आणि कसा घडलाय हा प्रकार? मनसेनं यावर काय भूमिका घेतलीय. पाहूयात हा विशेष रिपोर्ट.
Cab driver forces Marathi passenger to speak English over OTP
Cab driver forces Marathi passenger to speak English over OTPsaam tv
Published On

महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आलीय... मात्र तरीही रिक्षा आणि कॅबचालकांचा मराठीद्वेष काही केल्या कमी होत नाहीय... महाराष्ट्रात एका मराठी माणसानं मराठीत OTP सांगितल्यानं कॅबचालकानं कशी मग्रूरी दाखवलीय... पाहा...

ऐकलतं...विशेष म्हणजे, OTPवरून भांडण झाल्यानंतर कॅबचालक धमकी देत कोणाला तरी फोन करताना दिसतोय... त्यामुळे महाराष्ट्रात मराठी माणसालाचं कसं धमकावलं जातयं.. याचं हे उत्तम उदाहरण आहे....मुळात परिवहन मंत्र्यांनी नुकतचं रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणं बंधनकारक असल्याचं ठणकावून सांगितलं...मात्र शासनाचा हा नियम लागू झाल्यानंतरही काही मराठीद्वेषी चालक प्रत्यक्षात नियमांची पायमल्ली करताना दिसताय...त्यामुळे कॅबचालकांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेही आता अॅक्शन मोडवर आलीय...मनसे नेते अमित ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला आणि संबंधित चालकाला खडेबोल सुनावलेत...

मुळात कामधंद्यासाठी आपण राहतो त्या राज्यात तिथल्या भाषेचं जुजबी ज्ञान तरी आपल्याला हवेच...मात्र अॅप इंग्रजीत आहे मग इंग्रजीतचं बोला किंवा प्रवाशीचं मराठीत बोलत नाही, मग आम्ही कसं बोलू असं तकदातू कारणं कोणीही द्यायला नको...मनसे तर त्यांच्या पद्धतीनं खळ्ळखट्याक स्टाईल उत्तर देणारच...मात्र या माजोरड्या कॅबचालकावर परिवहन विभाग काय कारवाई करणार... हे पाहणंही महत्त्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com